मायलेकीसह अल्पवयीन मुलगा राहत्या घरी मृतावस्थेत, मीरा रोडमध्ये खळबळ

मुलगा आणि मुलगी दोघे गतिमंद असल्याची माहिती आहे. मंगळवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास तिघांचा मृतदेह सापडल्यानंतर परिसरात एकच खळबळ माजली. घटनास्थळी नयानगर पोलीस दाखल झाले असून घटनेचा पुढील तपास सुरु आहे.

मायलेकीसह अल्पवयीन मुलगा राहत्या घरी मृतावस्थेत, मीरा रोडमध्ये खळबळ
क्राईम

मीरा रोड : मीरा रोडच्या नरेंद्र पार्क परिसरातील एकाच घरात तिघांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. आई, मुलगा आणि मुलगी यांचे मृतदेह राहत्या घरात सापडले आहेत. मुंबई जवळच्या मीरा रोडच्या नया नगर पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली आहे.

काय आहे प्रकरण?

एकाच कुटुंबातील तिघांच्या संशयास्पद मृत्यूने चिंतेचं वातावरण पसरलं आहे. आई नसरीन वाघू (वय 47 वर्ष), मुलगी सदाद नाझ (21 वर्ष) आणि 13 वर्ष मुलाचा मृतदेह सापडला आहे. तिघांचे मृतदेह पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात पोलिसांनी पाठवले आहेत.

मुलगा आणि मुलगी दोघे गतिमंद असल्याची माहिती आहे. मंगळवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास तिघांचा मृतदेह सापडल्यानंतर परिसरात एकच खळबळ माजली. घटनास्थळी नयानगर पोलीस दाखल झाले असून घटनेचा पुढील तपास सुरु आहे.

पत्नीची घरात, पतीची कार्यालयात आत्महत्या

दुसरीकडे, पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीनेही आयुष्य संपवल्याची दुर्दैवी घटना काही महिन्यांपूर्वी अहमदनगरमध्ये समोर आली होती. 28 वर्षीय तरुणीने घरात आपली जीवनयात्रा संपवली, त्यानंतर कार्यालयात पतीने गळफास घेत आत्महत्या केली होती. लग्नानंतर अवघ्या चार महिन्यात नवदाम्पत्याची अखेर झाली होती.

भाडेकरु आणि घरमालकाच्या पत्नीचा मृतदेह

दरम्यान, अहमदनगरमध्ये भाडेकरु आणि घरमालकाच्या पत्नीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. विवाहबाह्य संबंधातून दोघांनी आत्महत्या केल्याचा आरोप झाला होता. पाथर्डी तालुक्यातील माणिकदौडी परिसरात बोरसेवाडी गावाजवळ हा प्रकार घडला होता.  रस्त्याच्या कडेला बाईक पार्क केलेली होती, त्यापासून 100 मीटर अंतरावर महिला आणि पुरुष अशा दोघांचे मृतदेह सापडले होते. दोघांचाही विषारी औषध प्राशन केल्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती.

कल्याणमध्ये महिलेची हत्या, पतीवर संशय

दुसरीकडे, कल्याणच्या हाय प्रोफाईल गांधारी परिसरात दिवसाढवळ्या एका घरकाम करणाऱ्या महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. कल्याण पश्चिमेतील हाय प्रोफाईल गांधारी परिसरात रिंग रोड रस्त्याचे काम सुरु आहे. या रस्त्यावर एका महिलेचा मृतदेह आढळून आला. मयत महिलेचे नाव लक्ष्मी मोहिते आहे. लक्ष्मीची हत्या दगडाने ठेचून करण्यात आली आहे. ती त्याच परिसरात घरकाम करते. लक्ष्मी ही भिवंडीतील सावद गाव परिसरात राहत होती. लक्ष्मीची हत्या तिचा पती जर्नादन मोहिते याने केली असल्याचा संशय पोलिसांना आहे. जालना जिल्ह्यात राहणारा लक्ष्मीचा पती आणि संशयित जनार्दन मोहिते सध्या बेपत्ता आहे

संबंधित बातम्या :

28 वर्षीय पत्नीसह एक वर्षाच्या मुलाची हत्या, पुण्यात पतीची गळफास घेऊन आत्महत्या

कोरोना झाल्याच्या रागातून पत्नीची हत्या, स्टेशन मास्तर पतीची आत्महत्या

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI