Rape | यवतमाळमध्ये 6 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार, जीवे मारण्याचा प्रयत्न, 30 वर्षीय नराधमाला अटक

यवतामाळ जिल्ह्यात मारेगाव तालुक्यातील पहापळ इथे 6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करुन तिच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.

Rape | यवतमाळमध्ये 6 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार, जीवे मारण्याचा प्रयत्न, 30 वर्षीय नराधमाला अटक
प्रातिनिधीक फोटोImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: May 12, 2022 | 7:33 AM

यवतमाळ : चिमुकलीवर अत्याचार करुन तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. यवतामाळ जिल्ह्यात (Yawatmal Crime News) मारेगाव तालुक्यातील पहापळ इथे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार (Rape) करुन तिच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे. बालिका दुसऱ्या दिवशी सकाळी झुडपात आढळल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी एका 30 वर्षीय नराधमाला ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मारोती मधुकर भेंडाळे असं आरोपीचं नाव आहे. तो त्याच गावातील रहिवासी असल्याची माहिती आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

यवतामाळ जिल्ह्यात मारेगाव तालुक्यातील पहापळ इथे 6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करुन तिच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.

नेमकं काय घडलं?

पहापळ येथील एक चिमुकली आपल्या आजी सोबत रात्रीच्या वेळेस शौचा करण्यासाठी गेली होती. मात्र काही वेळातच ती चिमुकली बेपत्ता झाली. आजीने घरी येऊन मुलगी दिसत नसल्याचं सांगितलं. तेव्हा घरच्यांनी चिमुकलीचा शोध घेतला, मात्र ती कुठेच आढळून आली नाही.

हे सुद्धा वाचा

गावातील तरुणाला अटक

दुसऱ्या दिवशी सकाळी ती एका काटेरी झुडपात आढळून आली. तेव्हा चिमुकलीने झालेला सर्व प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर मारेगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार देण्यात आली. मुलीच्या वैद्यकीय तपासणी अंती या प्रकरणात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गावातीलच 30 वर्षीय मारोती मधुकर भेंडाळे या नराधमाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार तपास करत आहेत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.