सुट्टीवर आलेल्या CRPF जवानाचा आनंद क्षणात लोपला, सिमेंटचा पिलर कोसळून लेकीचा करुण अंत

दिल्ली येथे सीआरपीएफमध्ये जवान म्हणून काम करणारे बाबाराव गेडाम बऱ्याच दिवसांनंतर सुट्टीवर घरी आले होते. बाबा घरी आल्यामुळे दिशासह संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. यावेळी दिशा आपल्या घराच्या छतावर कपडे वाळत घालण्यासाठी गेली होती.

सुट्टीवर आलेल्या CRPF जवानाचा आनंद क्षणात लोपला, सिमेंटचा पिलर कोसळून लेकीचा करुण अंत
सिमेंटचा पिलर कोसळून लहान मुलीचा मृत्यू
Image Credit source: टीव्ही9
| Edited By: | Updated on: Mar 01, 2022 | 10:06 AM

यवतमाळ : कपडे वाळत घालत असताना सिमेंटचा पिलर कोसळून अपघात (Cement Pillar) झाला. यामध्ये 13 वर्षीय मुलीचा चिरडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. घराच्या माडीवर बालिका कपडे वाळत टाकत असताना हा भीषण अपघात झाला. सिमेंटचा वजनदार पिलर अंगावर पडल्याने तेरा वर्षीय मुलीला प्राण गमवावे लागले. ही घटना यवतमाळ (Yawatmal) शहरातील वाघापूर परिसरातील प्रणील सोसायटी या ठिकाणी घडली. दिशा बाबाराव गेडाम असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. दिशाचे वडील दिल्ली येथे सीआरपीएफमध्ये जवान (CRPF Jawan) आहेत. मात्र सुट्टीवर आलेल्या पित्याचा आनंद क्षणात लोपल्याचं पाहायला मिळालं.

सीआरपीएफ जवान दीर्घ काळाने सुट्टीवर

दिल्ली येथे सीआरपीएफमध्ये जवान म्हणून काम करणारे बाबाराव गेडाम बऱ्याच दिवसांनंतर सुट्टीवर घरी आले होते. बाबा घरी आल्यामुळे दिशासह संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. यावेळी दिशा आपल्या घराच्या छतावर कपडे वाळत घालण्यासाठी गेली होती.

नेमका अपघात कसा घडला?

छतावर एक तार सिमेंटच्या पिलरला बांधली होता. दिशाने बादलीतील सर्व ओले कपडे तारांवर टाकले. त्या कपड्याचे वजन जास्त झाल्याने सिमेंटचा पिलर थेट तिच्या अंगावर कोसळला. यात तिचा पिलरखाली दबून जागीच मृत्यू झाला.

काही क्षणांपूर्वी घरात असलेले हसरे-खेळकर नि आनंदी वातावरण दुःखात बदलून गेले. या घटनेने गेडाम कुटुंबीय शोकसागरात बुडाले आहेत. परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या :

देव तारी त्याला कोण मारी…! रस्त्यावर धावणाऱ्या लेकराला मृत्यू चाटून गेला, एक सेकंदाचा उशीर आणि…

पिंपरीत पोरीला नांदवायला घेऊन गेलेल्या बापाचा सासरच्यांनी केलेल्या बेदम मारहाणीत मृत्यू

औरंगाबादमधील गंधेली परिसरात चारचाकी वाहनात स्फोट; जोडप्याचा जळून मृत्यू