Nagpur Fraud : ऑनलाईन अॅपच्या माध्यमातून कर्ज द्यायचे, मग कर्ज वसुलीसाठी बदनामीची धमकी, दोन आरोपींना अटक

| Updated on: Jul 31, 2022 | 8:14 PM

एका महिलेला लोन पाहिजे होतं आणि नेमका त्याच काळात तिच्या मोबाईलवर मेसेज आला आणि तिने तो ॲप ओपन केला ओपन केल्यानंतर तिला लोन मंजूर झालं. तिने लोन घेतलं मात्र त्याचं व्याज मोठ्या प्रमाणात होतं.

Nagpur Fraud : ऑनलाईन अॅपच्या माध्यमातून कर्ज द्यायचे, मग कर्ज वसुलीसाठी बदनामीची धमकी, दोन आरोपींना अटक
कर्ज वसुलीसाठी बदनामीची धमकी देणाऱ्या दोघांना अटक
Image Credit source: TV9
Follow us on

नागपूर : ऑनलाइन ॲप (Online App)च्या माध्यमातून कर्ज देत मग कर्ज वसुली करण्यासाठी सोशल मीडियावर बदनामी करायची धमकी (Threat) देणाऱ्या दोघांच्या नागपूरच्या अजनी पोलिसांनी मुसक्या आवळल्या (Arrest) आहेत. आरोपींची तार दूरवर जुळली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्या अनुषंगाने पोलीस सुद्धा तपास करत आहेत. कर्ज घेण्यासाठी अनेक जण वेगवेगळे प्रयत्न करतात. काही कारणास्तव मोठ्या बँकांतून कर्ज मिळाले नाही. म्हणून मग ते पर्याय शोधतात आणि अशा सायबर गुन्हेगारांच्या हाती लागतात. असाच प्रकार नागपूरमध्ये घडला. त्यानंतर या फसवणुकीचा भांडाफोड केला. सोशल मीडियाच्या जमान्यात वेगवेगळ्या ऑफर देणारे ॲप पाहायला मिळतात. मात्र यापासून सावध राहण्याची गरज आहे. नाही तर तुमची फसवणूक अटळ आहे.

काय आहे नेमकं प्रकरण ?

एका महिलेला लोन पाहिजे होतं आणि नेमका त्याच काळात तिच्या मोबाईलवर मेसेज आला आणि तिने तो ॲप ओपन केला ओपन केल्यानंतर तिला लोन मंजूर झालं. तिने लोन घेतलं मात्र त्याचं व्याज मोठ्या प्रमाणात होतं. ते भरण्यासाठी आठ दिवसाच्या आत फोन यायला सुरू झाले आणि फोन करून तिला लोन भरलं नाही तर तुमचे फोटो व्हायरल करू, अश्लील फोटो व्हायरल करू, अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात होत्या. याबाबत महिलेने पोलिसात तक्रार केली. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. तपासारम्यान पोलिसांनी गुन्हेगारांच्या साताऱ्यामधून मुसक्या आवळल्या. मात्र हे आरोपी केवळ मोहरे आहेत. याची तार मात्र दूर दूरपर्यंत असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. (Nagpur police arrested two people who cheated by giving loan through online app)

हे सुद्धा वाचा