Sangli Jail : सांगलीत कारागृहातून खुनातील संशयित पळाला, पोलिसांनी तातडीने केली नाकाबंदी, फरार आरोपीचा शोध सुरू

जेसीबी मालकाच्या खुनाच्या गुन्हात सुनीलला अटक झाली आहे. त्यामुळं तो कैदेत होता. परंतु, तिथंही त्यानं उपदव्याप केला. सुरक्षा भिंतीवरून उडी मारून त्यानं पळ काढला. कारागृह प्रशासनात खळबळ उडाली. आता पोलीस सुनीलचा शोध घेत आहेत.

Sangli Jail : सांगलीत कारागृहातून खुनातील संशयित पळाला, पोलिसांनी तातडीने केली नाकाबंदी, फरार आरोपीचा शोध सुरू
Follow us
| Updated on: Jul 31, 2022 | 3:16 PM

सांगली : सांगलीच्या तासगाव (Tasgaon) येथील जेसीबी चालकाच्या खून प्रकरणातील संशयित सुनील ज्ञानेश्वर राठोड (Sunil Rathod) हा आज सकाळी कारागृहाच्या भिंतीवरून उडी टाकून पळाला. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने नाकाबंदी केली. परंतु, त्याचा ठावठिकाणा समजू शकला नाही. सुनील हा योळगोड येथील राहणारा आहे. सुनील हा जेसीबी मालक हरी येडुपल पाटील (Hari Patil) (रा. मंगसुळी) यांच्याकडे चालक म्हणून काम करत होता. मालक हरी पाटील यांनी संशयित सुनील याची पत्नी पार्वती हिच्या अंगावर हात टाकला होता. त्यामुळे सुनील त्यांच्यावर चिडून होता. सुनील याने त्यांचा काटा काढण्याचे ठरवले. त्यानंतर सुनील आणि त्याच्या पत्नीने 8 जून 2021 रोजी जेसीबी मालक हरी पाटील याचा निर्घृण खून केला. त्यानंतर तासगावजवळ त्याचा मृतदेह विहिरीत टाकला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने याचा तपास करून खुनाचा छडा लावला.

संरक्षण भिंतीवरून मारली उडी

सुनील आणि त्याची पत्नी पार्वती हिला अटक केली होती. सुनील हा सांगली कारागृहात होता. त्याच्याकडे परिसरातील सफाईचे काम दिले होते. आज सकाळी पिठाची गिरण परिसरात सफाई करत असताना तो पळून जाण्याची संधी शोधत होता. परिसरात दोनच सुरक्षा रक्षक कार्यरत होते. सुनील याने कचरा टाकण्याच्या बहाण्याने संरक्षक भिंत गाठली. भिंतीवर चढून महापालिका अग्निशमन विभागाच्या मागील बाजूने पळाला. तो पळाल्याचे लक्षात येताच कारागृहात खळबळ उडाली. तात्काळ पोलीस प्रशासनाला कळवले. त्यानंतर पोलिसांनी काहीकाळ नाकाबंदी केली. परंतु, दुपारपर्यंत सुनील हाती लागला नव्हता.

काय आहे प्रकरण

सुनील हा जेसीबी चालक आहे. मालकाशी त्याच्या पत्नीचे भांडण झाले. यावरून मालकाने त्याच्या पत्नीवर हात उगारला. याचा सुनील व त्याच्या पत्नीला राग आला. यातून त्यांनी मालकाचा काटा काढल्याचा संशय आहे. जेसीबी मालकाच्या खुनाच्या गुन्हात सुनीलला अटक झाली आहे. त्यामुळं तो कैदेत होता. परंतु, तिथंही त्यानं उपदव्याप केला. सुरक्षा भिंतीवरून उडी मारून त्यानं पळ काढला. त्यामुळं कारागृह प्रशासनात खळबळ उडाली. आता पोलीस सुनीलचा शोध घेत आहेत. नाकाबंदी केली. तरीही सुनील काही पोलिसांत्या तावडीत आला नव्हता.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.