AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Accused : चौघे दारुच्या नशेत टुन्न, हप्ता दे नाहीतर धंदा बंद करण्याची धमकी, नागपूर पोलिसांनी केले गजाआड

तुझा व्यवसाय हा आमच्यामुळे चालतो. आम्ही या परिसरातील दादा आहोत. तू आम्हाला हप्ता दे. नाही दिला तर तुला जीवानिशी मारू. दारूच्या नशेत चार आरोपींनी त्याला धमकी दिली.

Nagpur Accused : चौघे दारुच्या नशेत टुन्न, हप्ता दे नाहीतर धंदा बंद करण्याची धमकी, नागपूर पोलिसांनी केले गजाआड
नागपूर पोलिसांनी केले गजाआड Image Credit source: t v 9
| Edited By: | Updated on: Sep 02, 2022 | 4:17 PM
Share

नागपूर : पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीतील ही घटना. चार जणांनी मस्त दारू ढोकसली. त्यानंतर रस्त्यावर फिरत असणाऱ्या व्यक्तीला पकडले. आम्ही या परिसरातील दादा आहोत. तू आम्हाला हप्ता दे नाहीतर तुझा धंदा बंद करू. तुला जीवानिशी मारू अशी धमकी दिली. मात्र त्या व्यक्तीने पोलिसात तक्रार (Police Complaint) केली. चारही आरोपी गजाआड झालेत. यातील मुख्य आरोपी हा काही दिवसापूर्वीच एमपीडीएच्या गुन्ह्यातून सुटून जेलच्या बाहेर आला होता. इतरांवरही अनेक गुन्हे दाखल आहेत. आता पुन्हा त्यांना जेलवारी करावी लागत आहे. अशी माहिती पाचपावली पोलीस (Pachpawali Police) ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मेंढे (Sanjay Mendhe) यांनी दिली. नागपूर पोलिसांनी दादागिरी करणारे आणि गुंड प्रवृत्तीचे लोकांविरुद्ध मोहीम छेडली आहे. अशामध्ये याच दादांना पकडून आता त्यांचा लेखाजोखा पोलीस काढत आहेत.

तीन हजार रुपये मागितला हप्ता

वीरेंद्र गडबलिया नावाचा व्यक्ती इतवारी रेल्वे स्टेशन परिसरात पाण्याच्या बाटल्या विकून आपला व्यवसाय करतो. तो रात्रीच्या वेळी घराबाहेर फिरत असताना चारही आरोपीने त्याला घेरले. तुझा व्यवसाय हा आमच्यामुळे चालतो. आम्ही या परिसरातील दादा आहोत. तू आम्हाला हप्ता दे. नाही दिला तर तुला जीवानिशी मारू. दारूच्या नशेत चार आरोपींनी त्याला धमकी दिली. त्याच्याकडून पाचशे रुपये घेतले. तीन हजार रुपये हप्ता देण्याचं आरोपींनी त्याला सांगितलं. मात्र हा घडलेला प्रकार त्याने पोलिसांना सांगितला. पोलिसांनी या आरोपींच्या लगेच त्यांच्या मुसक्या आवळल्या.

चारही आरोपी नशेत टून्न

चारही आरोपी दारूचा नसेल टून्न होते. महत्त्वाचं म्हणजे यातील मुख्य आरोपी हा काही दिवसांपूर्वी एमपीडीएच्या गुन्ह्यात जेलमध्ये गेला होता. आता तो सुटून बाहेर आला. पुन्हा त्याने परिसरात आपली दादागिरी सुरू केली. आता पोलीस त्याची सगळी कुंडली काढत आहेत. त्यांनी आतापर्यंत कोणकोणते गुन्हे केले. याचे पुरावे आता पोलीस गोळा करत आहेत. त्यामुळं या आरोपींची नशा उतरेल.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.