नागपूरात कुख्यात गुंडाची दारुड्यांकडून दगडाने ठेचून हत्या

| Updated on: Nov 03, 2021 | 3:52 PM

खोब्रागडे चौकात पाच दारुड्यांमध्ये वाद सुरू होता. फ्रॅंक तिथे उभा राहून वाद बघत असताना भांडण करत असलेल्या एकाने त्याला काय बघतोय बे.... असं म्हटल्यानंतर फ्रॅंक अण्णा चिडला. त्यानंतर फ्रॅंक अण्णा आणि त्या पाच आरोपींमध्ये वाद सुरू झाला

नागपूरात कुख्यात गुंडाची दारुड्यांकडून दगडाने ठेचून हत्या
नागपूरात कुख्यात गुंडाची दारुड्यांकडून दगडाने ठेचून हत्या
Follow us on

नागपूर : दारुड्यांसोबत झालेल्या वादातून एका कुख्यात गुंडाची हत्या झाल्याची घटना नागपूरात घडली आहे. फ्रँक भूषण अँथोनी असे मयत गुंडाचे नाव आहे. दारुड्यांमध्ये सुरु असलेला वाद पाहत असल्याच्या कारणावरुन फ्रँक आणि दारुड्यांमध्ये वाद झाला. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. दारूच्या नशेत झालेल्या वादातून संगनमत करून याची धारधार शस्त्रांनी भोसकून हत्या करण्यात आली. (Notorious criminal murdered by five drunkerds in Nagpur)

नेमकं प्रकरण काय?

फ्रँक अँथोनी हा अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कौशल्या नगर भागात राहतो. रात्री तो जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या सासुरवाडीत गेला होता. त्यावेळी खोब्रागडे चौकात पाच दारुड्यांमध्ये वाद सुरू होता. फ्रँक तिथे उभा राहून वाद बघत असताना भांडण करत असलेल्या एकाने त्याला काय बघतोय बे…. असं म्हटल्यानंतर फ्रँक अण्णा चिडला. त्यानंतर फ्रँक अण्णा आणि त्या पाच आरोपींमध्ये वाद सुरू झाला असता त्यांनी त्यांच्या जवळ असलेल्या शस्त्राने फ्रँक अण्णाला जखमी केले. यावर समाधान न झाल्याने आरोपींनी त्याची दगडाने ठेचून हत्या हत्या केली. यावेळी पाचही आरोपी दारूच्या नशेत होते. घटनेची माहिती समजताच जरीपटका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत फ्रँक अण्णाचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली आहे.

गुन्हेगारांच्या नांग्या ठेचण्यासाठी पोलिसांचं ऑपरेशन ऑल-आऊट

नागपूरला क्राईम कॅपिटल म्हणून संबोधलं जातं. कारण या शहरात अगदी क्षुल्लक कारणांवरुन हत्येच्या सर्रास घटना घडतात. शहरात कधी गँगवार तर कधी चोरी तर कधी हत्येच्या घटना वारंवार घडताना दिसतात. गुन्हेगारीच्या या वाढत्या गुन्ह्यांवरुन पोलिसांच्या कार्यक्षमतेवर अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात येतो. त्यामुळे नागपूर पोलीसही आता अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. गुन्हेगारांच्या नांग्या ठेचण्यासाठी नागपूर पोलिसांनी आता ऑल-आऊट मिशन सुरु केलंय.

रेकॉर्डवरील गुन्हेगारांची चौकशी सुरु
आपण ऑल-आऊट हे शब्द वाचले तर डोळ्यांसमोर टीव्हीवर येणारी मच्छरांना मारणारी ऑल-आऊट मशीनची जाहिरात नक्कीच येईल. ते ऑल-आऊट मशीन जसं मच्छरांसाठी यमराज ठरत त्यांचा नायनाट करतं अगदी तसंच नागपूर पोलीस शहरातील गुन्हेगारीतील सराईत मच्छरांचा नायनाट करणार आहेत. त्यासाठीच पोलिसांनी ऑपरेशन ऑल-आऊट ही मोहिम सुरु केली आहे. त्यानुसार पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार, धारदार शस्त्र आणि कट्टे (बंदूक) बाळगणाऱ्यांची चौकशी सुरु केली आहे. (Notorious criminal murdered by five drunkerds in Nagpur)

इतर बातम्या

फेसबुकवरील मैत्री महागात, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार

सावधान! औरंगाबादेत चोरट्यांचा धुमाकूळ, एकाच रात्रीत चार ठिकाणी चोऱ्या, घर,दुकान,ऑफिसमध्ये लूट