AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फेसबुकवरील मैत्री महागात, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार

पीडित तरुण आणि आरोपी तरुण या दोघांची फेसबुकवर 2 महिन्यांपूर्वी मैत्री झाली होती. तरुणीच्या दाव्यानुसार आरोपीने तिला नोकरीच्या मुलाखतीच्या बहाण्याने ग्वाल्हेरला बोलावले. ती ग्वाल्हेरला आल्यावर मुलाने तिला बहोदापूर येथील भाड्याच्या खोलीत नेले आणि झोपेच्या गोळ्या मिसळलेले शीतपेय दिले

फेसबुकवरील मैत्री महागात, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Nov 03, 2021 | 1:54 PM
Share

भोपाळ : ग्वाल्हेरमध्ये 19 वर्षीय तरुणी बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पीडित तरुणी मूळ उत्तर प्रदेशातील झाशीची रहिवासी असून ती मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे राहून पोलीस भरती परीक्षेची तयारी करत होती. यावेळी एका फेसबुक फ्रेंडने नोकरीसाठी मुलाखत देण्याच्या बहाण्याने ग्वाल्हेरला बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

काय आहे प्रकरण?

पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार पीडित तरुण आणि आरोपी तरुण या दोघांची फेसबुकवर 2 महिन्यांपूर्वी मैत्री झाली होती. तरुणीच्या दाव्यानुसार आरोपीने तिला नोकरीच्या मुलाखतीच्या बहाण्याने ग्वाल्हेरला बोलावले. ती ग्वाल्हेरला आल्यावर मुलाने तिला बहोदापूर येथील भाड्याच्या खोलीत नेले आणि झोपेच्या गोळ्या मिसळलेले शीतपेय दिले. ती बेशुद्ध झाल्यावर तरुणाने तिच्यावर बलात्कार केला आणि तिचा व्हिडीओ शूट केला.

कागदपत्रांवरुन ब्लॅकमेलिंग

बलात्कारानंतर आरोपीने विद्यार्थिनीची कागदपत्रेही स्वतःजवळ ठेवली. रविवारी आरोपीने तिला कागदपत्रे देण्याच्या बहाण्याने पुन्हा बोलावले आणि तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. परंतु कागदपत्रे परत केली नाहीत. विद्यार्थिनीला डीआरपी लाईनच्या बाहेर सोडले. अखेर तिने बहोरापूर पोलीस ठाणे गाठून एफआयआर दाखल केला.

दोन महिन्यांपूर्वी फेसबुकवर ओळख

पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, सुमारे दोन महिन्यांपूर्वी आरोपी विद्यार्थ्याने फेसबुकवर संबंधित तरुणीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. दोघांमध्ये मोबाईलवर संवाद सुरू झाला. तरुणीने त्याला आपल्यासाठी एखादी चांगली नोकरी शोधण्यास सांगितले. त्यानुसार एका चांगल्या नोकरीच्या मुलाखतीसाठी या मुलाने विद्यार्थिनीला 19 ऑक्टोबर रोजी ग्वाल्हेरला बोलावले.

शीतपेयातून गुंगीचं औषध

विद्यार्थिनी ग्वाल्हेरला आल्यावर तरुण तिला डीआरपी लाईन परिसरात घेऊन गेला, जिथे त्याने भाड्यावर खोली घेऊन ठेवली होती. तिथे त्याने तरुणीला कोल्ड ड्रिंक्स प्यायला दिले. शीतपेय प्यायल्याबरोबर मुलगी बेशुद्ध झाली. शुद्धीवर आल्यावर तिला समजले की तिच्यासोबत फसवणूक झाली आहे.

तरुणीवर दोन वेळा अत्याचार

विद्यार्थिनीच्या तक्रारीत म्हटले आहे की, रविवारी आरोपीने तिला कागदपत्रं देण्याच्या बहाण्याने पुन्हा बोलावले. त्याने तिला पुन्हा तिच्या खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर तरुणीला डीआरपी लाइनच्या गेटवर सोडून पळून गेला. दोन वेळा अत्याचार केल्यानंतरही तरुणाने तिची कागदपत्रे परत केली नाहीत. बहोदापूर पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणी केली आहे. आरोपी आवेशला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक श्योपूरला रवाना झाले आहे.

संबंधित बातम्या :

इन्स्टावर ओळख, परदेशात पायलट असल्याचं सांगून पुणेकर महिलेला 10 लाखांना गंडा

गुजरातच्या बिझनेसमनची मुंबईत हत्या, गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

जाण्याची वेळ आली, इन्स्टाग्रामवर शेवटची पोस्ट, सौंदर्यवतीच्या अपघाती मृत्यूनंतर आईचा आत्महत्येचा प्रयत्न

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.