रेमडेसिव्हीर काळाबाजार प्रकरणात महाराष्ट्रात पहिलीच शिक्षा, वॉर्डबॉयला 3 वर्ष सश्रम कारावास

| Updated on: Jul 24, 2021 | 2:22 PM

महेंद्र रतनलाल रंगारी असे 28 वर्षीय वॉर्डबॉयचे नाव आहे. तो नागपूरच्या रंगारी चौकातील एका कोव्हिड सेंटरमध्ये कामाला होता. महेंद्र रेमडेसीव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार करत होता.

रेमडेसिव्हीर काळाबाजार प्रकरणात महाराष्ट्रात पहिलीच शिक्षा, वॉर्डबॉयला 3 वर्ष सश्रम कारावास
remdesivir injection
Follow us on

नागपूर : रेमडेसिव्हीर काळाबाजार प्रकरणात (Remdesivir Injection Black Market) महाराष्ट्रात पहिलीच शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपी वॉर्डबॉयला 3 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा विशेष न्यायालयाने ठोठावली. नागपुरात एप्रिल 2021 मध्ये महेंद्र रंगारी कोरोनाग्रस्त रुग्णाचे रेमडेसिव्हीर इंजेक्शन चोरून विकल्याचा आरोप आहे.

तपास तीन महिन्यांत पूर्ण

महेंद्र रतनलाल रंगारी असे 28 वर्षीय वॉर्डबॉयचे नाव आहे. तो नागपूरच्या रंगारी चौकातील एका कोव्हिड सेंटरमध्ये कामाला होता. महेंद्र रेमडेसीव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार करत होता. 17 एप्रिल 2021 रोजी हुडकेश्वर पोलिसांनी महेंद्रवर गुन्हा नोंदवला होता. उच्च न्यायालयाने या प्रकरणाला गांभीर्याने घेऊन फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालवण्याचे आदेश दिले होते. याचा तपास तीन महिन्यांत पूर्ण होऊन शुक्रवारी निकाल लागला. या प्रकरणी मुख्य न्यायदंडाधिकारी एस. बी. पवार यांच्या समक्ष सुनावणी झाली.

नेमकं काय घडलं?

महेंद्र काम करत असलेल्या कोव्हिड सेंटरमध्ये संबंधित कोरोनाग्रस्त महिलाही दाखल होती. तिला रेमडेसिव्हीरची आवश्यकता असल्याने कुटुंबीयांनी इंजेक्शनची व्यवस्था केली होती. 17 एप्रिल 2021 रोजी संध्याकाळच्या सुमारास महिला स्वच्छतागृहातून परत आली, तेव्हा तिला टेबलवर ठेवलेले इंजेक्शन गायब दिसले.

सीसीटीव्हीमध्ये पर्दाफाश

महिलेले लगेचच कोव्हिड सेंटरच्या प्रमुखाकडे तक्रार केली. या प्रकरणी पोलिसात चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु करण्यात आला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज तपासले असता वॉर्डबॉय महेंद्र रेमडेसिव्हीर इंजेक्शन चोरुन नेताना दिसला. त्यानुसार हुडकेश्वर पोलिसांनी महेंद्रवर गुन्हा नोंदवत त्याला अटक केली होती.

तपासानंतर पोलिसांनी आरोपी महेंद्र रंगारी याच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. न्यायालयात आरोपी महेंद्रवर चोरीचा गुन्हा सिद्ध झाल्याने मुख्य न्यायदंडाधिकारी एस. बी. पवार यांनी त्याला तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

संबंधित बातम्या :

रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या नावाखाली फसवणूक, 60 लाख रुपये जप्त, 6 जणांना बेड्या, मुंबई पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

मिरजच्या अपेक्स हॉस्पिटलमध्ये गुन्ह्यांची मालिका, रेमडेसिव्हीरचा काळा बाजार, एकाला अटक

(Remdesivir Injection Black Market Nagpur Ward boy gets three years of imprisonment)