मिरजच्या अपेक्स हॉस्पिटलमध्ये गुन्ह्यांची मालिका, रेमडेसिव्हीरचा काळा बाजार, एकाला अटक

अपेक्स हॉस्पिटलमधील रुग्णांच्या बिलाबाबत तफावत आणि रुग्णांवर उपचार करताना मृत्यूला कारणीभूत ठरल्याबद्दल डॉक्टर महेश जाधव, डॉक्टर मदन जाधव आणि ॲम्बुलन्स चालकांसह तेराहून अधिक जणांवर फसवणूक आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आधीच दाखल आहे. त्यानंतर अपेक्स रुग्णालय प्रकरणात नवनवीन माहिती उजेडात येत आहे.

मिरजच्या अपेक्स हॉस्पिटलमध्ये गुन्ह्यांची मालिका, रेमडेसिव्हीरचा काळा बाजार, एकाला अटक
remdesivir injection
Follow us
| Updated on: Jul 14, 2021 | 1:30 PM

सांगली : मिरजच्या अपेक्स हॉस्पिटलमधील आणखी एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळा बाजार करणारा पुरुष नर्स (ब्रदर) आमीर खानला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यामुळे सांगलीतील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

अपेक्स हॉस्पिटलमधील रुग्णांच्या बिलाबाबत तफावत आणि रुग्णांवर उपचार करताना मृत्यूला कारणीभूत ठरल्याबद्दल डॉक्टर महेश जाधव, डॉक्टर मदन जाधव आणि ॲम्बुलन्स चालकांसह तेराहून अधिक जणांवर फसवणूक आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आधीच दाखल आहे. त्यानंतर अपेक्स रुग्णालय प्रकरणात नवनवीन माहिती उजेडात येत आहे.

इंजेक्शनची काळ्या बाजाराने विक्री

अॅम्ब्युलन्स चालकांनी कमिशन घेऊन रुग्णांना उपचारासाठी अपेक्स हॉस्पिटलमध्ये आणल्याची माहिती ताजी असताना आता रुग्णालयामधील ब्रदर आमिर खान याला अटक झाली आहे. आरोपीने डॉक्टर महेश जाधव यांच्याशी जवळीक असणाऱ्या स्टाफला विश्वासात घेऊन रुग्णाला रेमडेसिव्हीर इंजेक्शन द्यायचे आहे, असे भासवून ते महागडे इंजेक्शन काळ्या बाजाराने विक्री केले असल्याचे तपासात समोर आले आहे. याबाबत गांधी चौक पोलिसांनी आमिर खानला अटक केली असून आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता आहे.

अपेक्स हॉस्पिटलमधील रुग्णांना रेमडेसिव्हीर इंजेक्शनची गरज आहे, असे सांगून ते 15 हजाराला विकले गेले. पण ते रुग्णांना वापरले जायचे नाही, ते बाहेर कुठे विकले गेले याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

87 रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी डॉ. महेश जाधव अटकेत

दुसरीकडे, मिरजच्या अपेक्स हॉस्पिटलमध्ये 87 रुग्णांच्या मृत्यू प्रकरणात सांगलीतील डॉ. महेश जाधव (Dr Mahesh Jadhav) याच्या अटकेनंतर गुन्ह्याची व्याप्ती वाढतानाच दिसत आहे. तीन रुग्णवाहिका चालकांनाही सांगलीतील गांधी चौकी पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे अटकेतील आरोपींची संख्या आता 13 वर गेली आहे.

संबंधित बातम्या :

80 रुग्णांच्या मृत्यूला डॉ. महेश दुधनकर जबाबदार, सांगलीत आणखी एका डॉक्टरवर आरोप, राष्ट्रवादीचे नेते आक्रमक

मृत रुग्ण जिवंत असल्याचे भासवून दोन दिवस उपचार, सांगलीत आणखी एका डॉक्टरला अटक

मिरजेच्या रुग्णालयात 87 रुग्णांचा मृत्यू प्रकरण, डॉ. महेश जाधवच्या डॉक्टर भावालाही अटक

मिरजेच्या रुग्णालयात 87 रुग्णांचा मृत्यू, तिघा अॅम्ब्युलन्स चालकांना अटक, आरोपींचा आकडा 13 वर

(Sangli Miraj Apex Care Hospital Male Nurse Brother Amir Khan arrested in remdesivir injection black market)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.