मिरजेच्या रुग्णालयात 87 रुग्णांचा मृत्यू प्रकरण, डॉ. महेश जाधवच्या डॉक्टर भावालाही अटक

शंकर देवकुळे

| Edited By: |

Updated on: Jun 27, 2021 | 7:52 AM

पोलिस तपास करत असताना डॉ. महेश जाधवचा भाऊ डॉ मदन जाधव आणि त्याच्या हॉस्पिटलमध्ये काम करणारा टेक्निशियन बस्वराज कांबळे या दोघांचाही समावेश असल्याचे पुढे आले आहे.

मिरजेच्या रुग्णालयात 87 रुग्णांचा मृत्यू प्रकरण, डॉ. महेश जाधवच्या डॉक्टर भावालाही अटक
डॉ. महेश जाधव
Follow us

सांगली : मिरजच्या अपेक्स हॉस्पिटलमध्ये 87 रुग्णांच्या मृत्यू प्रकरणात सांगलीतील डॉ. महेश जाधव (Dr Mahesh Jadhav) पाठोपाठ आता त्याचा भाऊ डॉ. मदन जाधव यालाही अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील आरोपींची संख्या आता 10 झाली आहे. महापालिका वैद्यकीय अधिकारी सुनील आंबोळे यांनी मिरजेतील अपेक्स हॉस्पिटलवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. 87 रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी अपेक्स कोव्हिड हॉस्पिटलच्या डॉ. महेश जाधव याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Sangli Miraj Apex Care Hospital Dr Mahesh Jadhav Doctor Brother Madan Jadhav arrested)

या प्रकरणात गांधी चौकी पोलिसांनी डॉ. महेश जाधवसह स्टाफमधील 8 जणांना अटक केली होती. या गुन्ह्याचा पोलिस तपास करत असताना डॉ. महेश जाधवचा भाऊ डॉ मदन जाधव आणि त्याच्या हॉस्पिटलमध्ये काम करणारा टेक्निशियन बस्वराज कांबळे या दोघांचाही समावेश असल्याचे पुढे आले आहे.

डॉ. मदन जाधवकडून कागदपत्रांची व्यवस्था

डॉ महेश जाधवला कोव्हिड हॉस्पिटल सुरु करण्यासाठी लागणारी महत्त्वपूर्ण कागदपत्रे डॉ मदन जाधव यांनी दिली होती. डॉ मदन जाधव आणि बस्वराज कांबळे या दोघांना शनिवारी पोलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. डॉ मदन जाधव हे तज्ज्ञ डॉक्टर आहेत. सांगली येथे त्यांचे हॉस्पिटल आहे. त्यांच्या अटकेमुळे या गुन्ह्यातील आरोपीची संख्या आता 10 झाली आहे.

काय आहे प्रकरण?

मिरजेतील अपेक्स हॉस्पिटलमधील 87 रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी अटकेत असलेल्या डॉक्टर महेश जाधवने या गुन्ह्यात जामीन मिळावा यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. परंतु तपासासाठी डॉ महेश जाधव याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात यावी अशी मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती. त्यानंतर डॉक्टरच्या पोलीस कोठडीत सहा दिवसांनी वाढ झाली आहे. तर रुग्णालयाच्या अकाउंटंट निशा पाटील यांनाही मिरज पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी अटक केली होती. त्यांनाही सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

अपात्र MBBS डॉक्टरकडून मूळव्याधीच्या एक हजार शस्त्रक्रिया, दादरमधून अटक

मिरजेच्या रुग्णालयात 87 रुग्णांचा मृत्यू, डॉ. जाधवच्या पोलीस कोठडीत वाढ, अकाऊंटंट महिलेलाही बेड्या

(Sangli Miraj Apex Care Hospital Dr Mahesh Jadhav Doctor Brother Madan Jadhav arrested)

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI