टपरीवर बसून नाश्ता करत होते, वादाची ठिणगी पेटली, तिथंच चाकूने भोसकले

मारपीट करत असताना आरोपीने आपल्या खिशातील चाकू काढला. मृतक प्रणय पात्रेच्या पोटात चाकू खुपसला.

टपरीवर बसून नाश्ता करत होते, वादाची ठिणगी पेटली, तिथंच चाकूने भोसकले
घटनेचा तपास करताना सदर पोलीस.
Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Nov 24, 2022 | 4:32 PM

नागपूर – सदर पोलीस स्टेशन हद्दीत भर दिवसा रस्त्यावर एकाची हत्या करण्यात आली. आरोपी आणि मृतकात शुल्लक कारणावरून वाद झाला. या वादाच्या ठिणगीत चाकूने पोटावर सपासप वार करत हत्या करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत तपास सुरू केलाय. हत्येच्या कारणाचा शोध घेतल्या जात आहे.  हत्या का आणि कशासाठी झाली याचा शोध पोलीस घेत असल्याचं झोन दोनचे डीसीपी राहुल मदने यांनी सांगितलं. भर दिवसा भर रस्त्यावर झालेल्या या हत्येने चिंता व्यक्त केली जात आहे.

ही घटना आहे आज सकाळी अकरा वाजताच्या दरम्यानची. आरोपी  आणि मृतक प्रणय पात्रे  एका टपरीवर बसून नाश्ता करत होते. त्यांच्यात  शुल्लक कारणावरून वाद झाला. दोघांनी एकमेकांसोबत मारपीट करायला सुरुवात केली.

मारपीट करत असताना आरोपीने आपल्या खिशातील चाकू काढला. मृतक प्रणय पात्रेच्या  पोटात चाकू खुपसला. रक्तबंबाळ झालेल्या मृतकाचा  जागीच मृत्यू झाला.

भर रस्त्यात झालेल्या या हत्तेमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.  घटनेचे गांभीर्य बघता पोलिसांचा फौज फाटा घटनास्थळी पोहोचला. हत्येच्या कारणाचा तपास सुरू केला.

नाश्ता करत असताना अचानक बाचाबाची सुरू झाली. पाहणारे पाहतच राहिले. दोघांनीही एकमेकांना मारहाण केली. या मारहाणीनंतर चवताळलेल्या आरोपीनं चाकू काढला. या चाकूनं प्रणय पात्रेच्या पोटात सपासप वार केले. या घटनेत प्रणय पात्रे जागीच ठार झाला.

घटनेची माहिती सदर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या दोघांमध्ये नेमका काय वाद झाला, याचा तपास आता पोलीस करत आहेत.