Jwala Dhote : मकोकामधील फरार आरोपी नितीन राऊतांच्या मुलासोबत फिरतोय; ज्वाला धोटे यांचा आरोप

| Updated on: Feb 22, 2022 | 12:28 AM

नागपूरच्या छावणी परिसरात राहणारा अभिषेक सिंग याला 14 ऑक्टोबर 2020 मध्ये सदर पोलीस स्टेशनमध्ये दाखल आर्म्स ऍक्ट व मकोका अंतर्गत गुन्ह्यांमुळे न्यायालयाने फरार घोषित केले होते. तेव्हापासून अभिषेक सिंग हा नागपूर पोलिसांच्या रेकॉर्डवर फरार गुन्हेगार म्हणून आहे.

Jwala Dhote : मकोकामधील फरार आरोपी नितीन राऊतांच्या मुलासोबत फिरतोय; ज्वाला धोटे यांचा आरोप
नितीन राऊत, ऊर्जा मंत्री
Follow us on

नागपूर : गेल्या दीड वर्षांपासून मकोका (Makoka) मधील फरार आरोपी हा राज्याचे ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत (Nitin Raut) यांचा मुलगा कुणाल राऊत व इतर सहकाऱ्यांसोबत देशभर प्रवास करीत असल्याचा खबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या ज्वाला धोटे (Jwala Dhote) यांनी केला आहे. त्यामुळे नागपूर पोलिसांनी फरार आरोपी अभिषेक सिंगला पकडण्यासाठी सखोल चौकशी करावी अशी मागणी ज्वाला धोटे यांनी केली आहे. तर फरार आरोपीला राजकीय नेत्यांकडून कुठलाही आश्रय मिळत नसल्याचे स्पष्टीकरण नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहे. (The fugitive accused from Makoka is walking with Nitin Raut’s son; Allegations of Jwala Dhote)

अभिषेक सिंग हा नागपूर पोलिसांच्या रेकॉर्डवर फरार गुन्हेगार

नागपूरच्या छावणी परिसरात राहणारा अभिषेक सिंग याला 14 ऑक्टोबर 2020 मध्ये सदर पोलीस स्टेशनमध्ये दाखल आर्म्स ऍक्ट व मकोका अंतर्गत गुन्ह्यांमुळे न्यायालयाने फरार घोषित केले होते. तेव्हापासून अभिषेक सिंग हा नागपूर पोलिसांच्या रेकॉर्डवर फरार गुन्हेगार म्हणून आहे. परंतु हाच अभिषेक सिंग गेल्या काही महिन्यात देशातील विविध ठिकाणी प्रवास करीत असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आले आहे. खास म्हणजे राज्याचे ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांचे चिरंजीव व महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष कुणाल राऊत यांच्यासोबत तो अनेक ठिकाणी फिरायला गेल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या ज्वाला धोटे यांनी केला आहे. या आरोपांच्या समर्थनात गेल्या काही महिन्यातील सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटो व व्हिडीओ ज्वाला धोटे यांनी नागपुरात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सादर केले.

राज्यातील मंत्र्यांकडून एका फरार आरोपीला राजाश्रय मिळत असल्याचा आरोप

एनएसयुआयच्या राष्ट्रीय परिषदेत काँग्रेस खासदार राहुल गांधी व नितीन राऊत यांच्यासोबतच फोटोही ज्वाला धोटे यांनी यावेळी दाखवले. त्यामुळे राज्यातील मंत्र्यांकडून एका फरार आरोपीला राजाश्रय मिळत असल्याचा आरोप धोटे यांनी केला. या फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी त्याच्यासोबत संपर्कात असलेल्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्याची मागणी ज्वाला धोटे यांनी पत्रकार परिषदेत केली. अभिषेक सिंग हा मकोका अंतर्गत फरार आरोपी असून त्याचा शोध नागपूर पोलीस घेत आहेत. मात्र त्याला कुठलाही राजकीय व्यक्तीकडून आश्रय मिळत नसल्याचे स्पष्टीकरण नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहे. ज्वाला धोटे यांनी लावलेल्या आरोपानंतर आता पोलीस काय ऍक्शन घेणार हे बघावं लागेल. (The fugitive accused from Makoka is walking with Nitin Raut’s son; Allegations of Jwala Dhote)

इतर बातम्या

Pegasus : पेगासस हेरगिरी प्रकरण : समितीचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर

Lakhimpur Kheri Case : लखीमपूर खेरी प्रकरणातील आरोपी आशिष मिश्राच्या जामिनाला आव्हान; मृत शेतकर्‍यांचे कुटुंबिय सर्वोच्च न्यायालय