AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही तर हद्दच झाली ! चोरट्यांनी थेट एटीएम मशीनच उखडून नेलं, सीसीटीव्ही यंत्रणाही गायब

यवतमाळमध्ये चोरट्यांनी एटीएमची कोणतीही तोडफोड न करताच सहजपणे एटीएम चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे आरोपींनी सीसीटीव्ही यंत्रणादेखील चोरली असल्याची माहिती समोर आली आहे (Thieves steal ATM machine in Yavatmal).

ही तर हद्दच झाली ! चोरट्यांनी थेट एटीएम मशीनच उखडून नेलं, सीसीटीव्ही यंत्रणाही गायब
चोरट्यांनी थेट एटीएम मशीनच उखडून नेलं, सीसीटीव्ही यंत्रणाही गायब, तपास कसा करायचा? पोलिसांपुढे आव्हान
| Edited By: Chetan Patil | Updated on: Jun 11, 2021 | 11:12 PM
Share

यवतमाळ : एटीएम फोडीच्या घटना आपण बऱ्याचदा ऐकल्या आहेत. चोरट्यांनी मोठमोठ्या शस्त्रांनी एटीएम मशीन फोडून पैसे चोरल्याच्या घटना याआधी घडल्या आहेत. विशेष म्हणजे अशा चोरीच्या घटनांमध्ये एखादा सुरक्षा रक्षकही जखमी होत असल्याच्या बातम्या आपण ऐकल्या किंवा वाचल्या असतील. मात्र, यवतमाळमध्ये तर त्याहीपेक्षा भयानक आणि विचित्र घटना घडली आहे. यवतमाळमध्ये चोरट्यांनी एटीएमची कोणतीही तोडफोड न करताच सहजपणे एटीएम चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे आरोपींनी सीसीटीव्ही यंत्रणादेखील चोरली असल्याची माहिती समोर आली आहे (Thieves steal ATM machine in Yavatmal).

कुठलीही तोडफोड न करता एटीएमची चोरी

यवतमाळ जिल्ह्यातील महागांव शहरातील प्रभाग 1 मध्ये ‘इंडिया वन’ या बंगळुरुच्या कंपनीचे एटीएम सहा महिन्यांपासून सुरू करण्यात आले होते. पण गुरुवारी (10 जून) रात्री पावसाचा फायदा घेत चोरट्यांनी एटीएम मशीनच चोरुन नेलं. विशेष म्हणजे चोरट्यांनी कुठलीही तोडफोड न करता सहजरित्या चोरून नेल्याची घटना सकाळी उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे या चोरीकरता चाब्यांचा वापरसुध्दा करण्यात आल्याचे आढळून आले आहे (Thieves steal ATM machine in Yavatmal).

पोलिसांपुढे मोठं आव्हान

चोरीच्या घटनेच्या दोन दिवसांआधीच एटीएममध्ये 5 लाख रुपये टाकण्यात आले होते, अशी माहिती आता समोर आली आहे. चोरट्यांनी नेमके किती रुपये पळवून नेले याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच महागांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास चव्हाण आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी शेंगेपल्लू हे पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. तसेच श्वान पथकासही घटनास्थळी दाखल करण्यात आलं. चोरांना पकडणं पोलिसांपुढे मोठं आव्हान आहे.

हेही वाचा : अवघ्या दहा हजाराचा मोबाईल चोरला, झटापटीत महिलेचा चालत्या रिक्षातून खाली पडून मृत्यू, आरोपींना 24 तासात बेड्या

Follow Us
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला