अवघ्या दहा हजाराचा मोबाईल चोरला, झटापटीत महिलेचा चालत्या रिक्षातून खाली पडून मृत्यू, आरोपींना 24 तासात बेड्या

मोबाईल वाचविण्यासाठी कन्मिला यांनी प्रयत्न केले. पण यावेळी कन्मिला यांचा रिक्षातून तोल जाऊन त्या खाली पडल्या (Police arrest mobile thieves who are responsible of woman death in Thane)

अवघ्या दहा हजाराचा मोबाईल चोरला, झटापटीत महिलेचा चालत्या रिक्षातून खाली पडून मृत्यू, आरोपींना 24 तासात बेड्या
आरोपींना 24 तासात बेड्या
Follow us
| Updated on: Jun 11, 2021 | 9:35 PM

ठाणे : ठाण्यात पूर्व द्रुतगती महामार्गावरील तीन हात नाका परिसरात बुधवारी (9 जून) रात्री दोन मोबाईल चोरट्यांनी महिलेच्या हातातील मोबाईल हिसकावल्याचा प्रयत्न केला. यावेळी महिला मोबाईल पकडत असताना तिचा चालत्या रिक्षातून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी फरार असलेल्या चोरट्यांना 24 तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहेत (Police arrest mobile thieves who are responsible of woman death in Thane).

नेमकं प्रकरण काय?

कन्मिला रायसिंग ही महिला मुळची मणिपूरमधील आहे. कन्मिला या मुंबईच्या सांताक्रूझ येथील कलीना परिसरात राहायच्या. त्यांच्यासोबत त्यांची एक मैत्रीण देखील ठाण्यातील एका मॉलमध्ये नोकरी करायची. मॉलमधूल घरी निघालेल्या दोघींनी कलीना येथे जाण्यासाठी रिक्षा पकडली. रिक्षा मुंबईच्या दिशेने निघाली होती. त्यांची रिक्षा तीन हात नाका जवळ आल्यानंतर दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांपैकी दुचाकीच्या मागे बसलेल्या आरोपीने धावत्या रिक्षातील कन्मिला यांच्या हातातील मोबाईल खेचला (Police arrest mobile thieves who are responsible of woman death in Thane).

मोबाईल वाचविण्यासाठी कन्मिला यांनी प्रयत्न केले. पण यावेळी कन्मिला यांचा रिक्षातून तोल जाऊन त्या खाली पडल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर महिलेला जखमी अवस्थेत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलविले. पण कन्मिला यांचा अवघ्या दीड तासात मृत्यू झाला. कन्मिला यांच्या मृत्यूनंतर महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

आरोपींना अखेर बेड्या

याप्रकरणी अल्केश उर्फ परवेझ अन्सारी आणि सोहेल अन्सारी या आरोपींनी पोलिसांनी अटक केली आहे. दोघेही आरोपी हे भिवंडीत राहतात. दोघेही सराईत मोबाईल चोरटे असून त्यांच्याविरोधात कोनगाव आणि नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचा तपास नौपाडा पोलिसांनी जलदगतीने करून आरोपींकडून मृतक महिलेच्या मोबाईलसह आणखी 3 मोबाईल, दुचाकी हस्तगत केली. तर, ठाणे सत्र न्यायालयाने दोघांनाही 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

चोरट्यांना पोलिसांचा धाक नाही का?

भर रस्त्यात आणि धावत्या रिक्षातून दुचाकीवरून रिक्षात बसलेल्या कन्मिला यांचा 10 हजार रुपयांचा मोबाईल खेचण्याचा यशस्वी प्रयत्न झाल्यानंतर चोरटे पोबारा झाले. महिला रस्त्यावर असो, किंवा सोसायटीच्या गेटवर असो पण चोरटे कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता सोनसाखळी आणि मोबाईल खेचून धूमस्टाईलने पोबारा होतात. या घटनेमुळे चोरट्यांना पोलिसांचे भयच राहिलेले नाही, असंच समोर येत आहे. ठाण्यात हा प्रकार नवीन नाही, काही दिवसांपूर्वीच सोसायटीच्या लिप्टजवळ पोहचलेल्या महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून सोनसाखळी चोरीची घटना समोर आली होती. दम्यान, बुधवारच्या घटनेने ठाण्यात महिला असुरक्षित असल्याचे  चित्र दिसत आहे.

संबंधित बातमी : ठाण्यात मोबाईल चोरट्यांची इतकी हिंमत? चालत्या रिक्षेतल्या महिलेच्या हातून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न, निष्पाप महिलेला मृत्यू

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.