भंडाऱ्यातून नागपुरात यायचे अन् बाईक चोरुन विकायचे, ‘असे’ अडकले पोलिसांच्या जाळ्यात

| Updated on: Nov 15, 2022 | 8:33 PM

नागपुरात येऊन ज्या वस्त्यांमध्ये फिरुन रेकी करायचे. मग घराबाहेर लावलेल्या बाईक चोरी करायचे. त्या बाईक ग्रामीण भागात न्यायचे आणि कमी पैशांमध्ये विकायचे.

भंडाऱ्यातून नागपुरात यायचे अन् बाईक चोरुन विकायचे, असे अडकले पोलिसांच्या जाळ्यात
भंडाऱ्यातून नागपुरात यायचे अन् बाईक चोरुन विकायचे
Image Credit source: TV9
Follow us on

नागपूर : शहरात बाईक चोरुन ग्रामीण भागात विकणाऱ्या दुकलीला नागपूरच्या वाठोडा पोलिसांनी अटक केली आहे. हे चोरटे भंडाऱ्यातून नागपुरात यायचे आणि बाईक चोरायचे. चोरलेल्या बाईक ते ग्रामीण भागात नेऊन विकायचे. आरोपींकडून आतापर्यंत सहा गुन्ह्यांची उकल झाली असून, त्यांच्याकडून सहा बाईक जप्त करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

एकाच नंबरच्या दोन बाईक दिसल्याने पोलिसांना संशय आला

वाठोडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी पेट्रोलिंगवर असताना त्यांना एकाच नंबरच्या दोन पल्सर बाईक दोन व्यक्ती घेऊन जाताना दिसले. पोलिसांना संशय आला आणि पोलिसांनी त्यांची विचारपूस केली.

चौकशीत ते भंडारा जिल्ह्यातील असून, ते नागपुरात बाईक चोरण्यासाठी येत असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत गुन्ह्याची सखोल चौकशी केली.

हे सुद्धा वाचा

नागपुरात वस्त्यांमधील बाईक चोरायचे

नागपुरात येऊन ज्या वस्त्यांमध्ये फिरुन रेकी करायचे. मग घराबाहेर लावलेल्या बाईक चोरी करायचे. त्या बाईक ग्रामीण भागात न्यायचे आणि कमी पैशांमध्ये विकायचे. मग पुन्हा आपल्या जिल्ह्यात जाऊन काही दिवस राहायचे.

यावेळी डाव फसला आणि पोलिसांच्या तावडीत सापडले

मात्र यावेळी त्यांचा डाव फसला आणि दोन आरोपी पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी आतापर्यंत सहा बाईक चोरल्याची कबुली दिली. त्या बाईकसुद्धा पोलिसांनी हस्तगत केल्या.

पोलिसांकडून अधिक तपास सुरु

बाईक चोरांची टोळीच सक्रिय असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यानुसार पोलीस या टोळीमध्ये आणखी किती लोकांचा समावेश आहे, याचा तपास करीत आहेत.

बाईक कमी पैशात मिळायच्या, त्यामुळे या चोरट्यांकडे ग्राहकांचीही कमी नव्हती. यांचा धंदा जोरात सुरू होता. मात्र आता हे पोलिसांच्या हाती लागल्याने यांनी कुठे कुठे असे कारनामे केले याचे पत्ते उघड होणार आहेत.