Nagpur Crime : नागपूर पोलिसांची ड्रग्जविरोधी मोहिम जोमात, ड्रग्जसह तीन जण अटक

तरुण पिढी अंमली पदार्थ्यांच्या आहारी जात आहे. यामुळे नागपूर पोलिसांनी ऑपरेशन नार्को अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी ड्रग्ज तस्करांविरोधात कारवाई राबवली आहे.

Nagpur Crime : नागपूर पोलिसांची ड्रग्जविरोधी मोहिम जोमात, ड्रग्जसह तीन जण अटक
नागपूरमध्ये ड्र्ग्जविरोधी कारवाईImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 18, 2023 | 7:04 PM

नागपूर / 18 ऑगस्ट 2023 : नागपूर पोलिसांनी ड्रग विरोधात मोहीम सुरु केली असून, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कारवाया सुद्धा होताना दिसत आहे. नागपूरच्या ताजबागमध्ये ताजुद्दिन बाबाच्या उर्फ दरम्यान विकण्यासाठी आणण्यात आलेले एमडी ड्रग्स पोलिसांनी पकडण्यात यश मिळविले. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे ड्रग्ज तस्करांचे धाबे दणाणले आहेत. नागपूरचा ताजबाग परिसर काही वर्षांपूर्वी एक प्रकारे ड्रगचा अड्डा बनलेला होता. मात्र त्या ठिकाणी पोलिसांनी वारंवार ऑपरेशन राबवत तिथल्या ड्रग विक्रेत्यांची कंबरडे मोडलं. मात्र अजूनही या ठिकाणी काही गुन्हेगार काम करत असल्याच या कारवाईनंतर दिसून आलं.

नागपूर पोलिसांकडून ऑपरेशन नार्को सुरु

नागपूर शहरात पोलिसांनी ऑपरेशन नार्को राबवलं आणि त्यात अनेकांना अटक करून जेलमध्ये सुद्धा टाकलं. मात्र तरीही नागपूरमध्ये ड्रगची विक्री होत असल्याचं समोर आलं आहे. नागपुरात ताजुद्दिन बाबाचा उर्फ सुरू आहे. यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात लोक येत असतात. त्या ठिकाणी विकण्याच्या उद्देशाने एमडी ड्रग आणण्यात आलं होतं. मात्र या संदर्भातली गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.

गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखा पोलीस आणि नंदनवन पोलिसांनी सापळा रचत कारवाई केली. तीन आरोपींना अटक करत आरोपींकडून 12.12 ग्राम ड्रग हस्तगत करण्यात आलं आहे. पोलिसांनी आधीच आवाहन केले आहे की, ड्रग विकणाऱ्यांची किंवा घेणाऱ्यांची खैर केली जाणार नाही. त्याप्रमाणे पोलिसांनी कारवाई करत हे ड्रग तर जप्त केलं आहे. सोबत तीन आरोपींना सुद्धा अटक करून आता त्यांची जाळं शोधण्याचं काम सुरू केलं असल्याचं नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.