घरफोड्या करायचा, पळून जायचा; लपलेल्या आरोपीच्या अशा आवळल्या मुसक्या

सोहेल बचेस्वर असे आरोपीचे नाव आहे. बरगड तालुक्यातील जेवनारा गावातील रहिवासी आहे. सीसीटीव्ही फूटेजचे विश्लेषण करून आरोपीला अटक करण्यात आली.

घरफोड्या करायचा, पळून जायचा; लपलेल्या आरोपीच्या अशा आवळल्या मुसक्या
Follow us
| Updated on: Feb 19, 2023 | 4:40 PM

नागपूर : मध्य प्रदेशातील सराईत गुन्हेगार (Nagpur Crime) जेलमधून फरार होता. तो नागपुरात येऊन काही काळ राहिला. या ठिकाणी त्याने मोठी घरफोडीची घटना केली. नागपुरातूनही त्याने पळ काढला. नंतर तो मध्य प्रदेशातील दुर्गम भागात गेला. त्या ठिकाणी राहत होता. नागपुरात केलेल्या चोरीतून मिळालेल्या पैशातून त्याने अनेक साहित्य घेतलं. त्याने उसाचा रस काढणारी मशीन खरेदी केली. आपला मध्य प्रदेशात व्यवसाय थाटला. मात्र नागपूरच्या सक्करदरा पोलिसांनी (Nagpur Police) घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास अगदी बारकाईने केला गेला.

हे साहित्य केले जप्त

घरफोडीचा गुन्हा सप्टेंबर महिन्यात घडला होता. एमपीतील शिवणी जिल्ह्यातील दुर्गम गावात हा आरोपी राहत होता. गुप्त बातमीदारांच्या माध्यमातून हा गुन्हा उघडकीस आला. मोबाईल, मशीन, होम थिएटर सिस्टीम,ऊसाचे रस काढणारी मशीन हे साहित्य जप्त केले. सोहेल बचेस्वर असे आरोपीचे नाव आहे. बरगड तालुक्यातील जेवनारा गावातील रहिवासी आहे. सीसीटीव्ही फूटेजचे विश्लेषण करून आरोपीला अटक करण्यात आली.

एमपीत जाऊन अटक

तांत्रिक पद्धतीने तपास करत त्याचा शोध घेतला. तो मध्य प्रदेशात दुर्गम भागात असल्याचं पुढं आलं. यावरून पोलिसांची एक टीम मध्य प्रदेशात जाऊन त्याला अटक केली. त्याने घरफोडी करून त्या पैशातून घेतलेला सगळं साहित्यसुद्धा पोलिसांनी जप्त केलं.

पाच महिन्यांपासून फरार

मध्य प्रदेशातील जेलमधून फरार होऊन नागपुरात आला. नागपुरात घरफोडी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला नागपूरच्या सक्करदरा पोलिसांनी अटक केली. गेल्या पाच महिन्यापासून तो मध्य प्रदेशात लपून बसला होता. त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून मुद्देमालसुद्धा जप्त करण्यात आला. अशी माहिती सक्करदरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी दिली.

दुकानदारी आली उघडकीस

गुन्हेगार कितीही शातीर असला तरी तो पोलिसांपासून जास्त काळ लपून राहू शकत नाही. हे पुन्हा एकदा नागपूर पोलिसांनी दाखवून दिलं. हा आरोपी आधी मध्ये प्रदेशातील जेलमध्ये होता. तिथून पळत नागपुरात आला. येथे घरफोड्या केल्या. त्यानंतर पुन्हा मध्य प्रदेशात जाऊन घरफोडीच्या पैशातून दुकानदारी थाटली.पण, नागपूर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

Non Stop LIVE Update
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?.
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस.
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?.
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात.
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?.