मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असेलल्या ठिकाणी लपून बसलेला भयानक नक्षलवादी; दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई

| Updated on: Sep 18, 2022 | 10:35 PM

या नक्षलवाद्यावर 2004 पासून तो फरार होता. त्याच्यावर 15 लाखाचे बक्षीस ठेवण्यात आले होते. नालासोपारा येथील एका चाळीवर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली.

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असेलल्या ठिकाणी लपून बसलेला भयानक नक्षलवादी; दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई
Follow us on

ठाणे : मुंबईपासून हाकेच्या अंतारावर असेलल्या ठिकाणी लपून बसलेला भयानक नक्षलवाद्याला(Nalaksalist) जेरबंद करण्यात आले आहे. दहशतवाद विरोधी पथक महाराष्ट्र ठाणे युनिटने मोठी कारवाई केली आहे. नालासोपारा(Nalasopara) येथे छापा टाकून नक्षलवादी कारवायांमध्ये सहभागी असणाऱ्या एका सराईत माओवादीला ताब्यात घेण्यात आले आहे.

या नक्षलवाद्यावर 2004 पासून तो फरार होता. त्याच्यावर 15 लाखाचे बक्षीस ठेवण्यात आले होते. नालासोपारा येथील एका चाळीवर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली आहे. दहशतवाद विरोधी पथकाच्या या कारवाही मुळे महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने नालासोपारा येथून पकडलेल्या नक्षलवाद्याचे नाव करु हुलास यादव असे आहे. यादव हा मागच्या दीड महिन्यापासून नालासोपारा येथे राहत होता.

दहशतवाद विरोधी पथकाने अटक केलेला यादव हा कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओ) या केंद्र सरकारने बंदी घातलेल्या संघटनेचा हजारीबाग येथील रिजनल कमिटी सदस्य आहे.

झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यातील कटकमसंडी गाव दोडगा, तहसीलचा तो रहिवासी आहे. मागील काही दिवसांपासून तो पालघर जिल्ह्यातील नालासोपारा पूर्व श्रीराम नगर मधील जयभवानी वेल्फेअर सोसायटी मधील एका चाळीत राहत होता.

यादव हा सन 2004 पासून नक्षली कारवाया मध्ये सक्रिय आहे. याच्यावर सरकार ने 15 लाखाचे बक्षीस ठेवले होते. कारू यादव यांच्या उजवा पाय फॅक्चर झाल्याने उपचारासाठी तो येथे आला होता. या ठिकाणी त्याची मुलगी, जावई, आणि नातवासह तो राहत होता.