AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded | वाह रे चोरा.. आधी हात जोडले अन् मग देवाच्या दानपेटीवर डल्ला, नांदेडच्या मंदिरातली चोरी CCTV त कैद

दानपेटीतील जवळपास एक लाख रुपये चोरट्यांनी पळवले असल्याची माहिती मंदिरदाच्या पुजाऱ्यांनी दिली आहे. आता सीसीटीव्हीत दिसणाऱ्या इसमांचा माग काढला जात आहे.

Nanded | वाह रे चोरा.. आधी हात जोडले अन् मग देवाच्या दानपेटीवर डल्ला, नांदेडच्या मंदिरातली चोरी CCTV त कैद
नांदेडच्य दयानंद नगरातील चोरी सीसीटीव्हीत कैैद Image Credit source: TV9 Marathi
Reporter Rajiv Giri
Reporter Rajiv Giri | Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Apr 10, 2022 | 1:47 PM
Share

नांदेड | शहरातील दयानंद नगर भागातील दत्त मंदिरातील दानपेटी (Donation Box) चोरीला गेल्याची घटना घडली आहे. शनिवारी रात्री झालेली ही चोरी (Nanded theft) घडली असून मंदिराच्या बाहेरील आणि आतील सीसीटीव्हीमध्ये (CCTV) चोरीची ही घटना कैद झाली आहे. प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांच्या हत्याकांडानंतर हादरलेल्या नांदेडमधील गुन्हेगारीच्या घटना वाढतच आहेत. चार दिवसांपूर्वी संजय बियाणींची हत्या झाली. त्यानंतर एका वसाहतीतील पार्किंमधील उभ्या बाईक्स जाळण्यात आल्या होत्या. काल पोलीस पथकावर गुंडांनी तलवारीने हल्ला केल्याची घटना घडली होती. आता दयानंद नगरातील दानपेटी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. त्यामुळे आता मंदिरातील देवही सुरक्षित नसल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण होत आहे.

चोरानं आधी हात जोडले…

दरम्यान, दयानंद नगरातील दत्त मंदिरात घडलेली चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मंदिराबाहेरील आणि मंदिराच्या आतील दोन सीसीटीव्हींची दृश्य समोर आली आहेत. मंदिराबाहेर असताना दोन चोर सीसीटीव्हीत दिसतात. सुरुवातीला आपल्या मागेपुढे कुणी नाही ना, याची खात्री करून घेतात. नंतर त्यापैकी एक चोर देवासमोर हात जोडतो आणि दुसरा चोर आत शिरण्यासाठी पुढे जातो. मंदिराच्या आतील सीसीटीव्हीमध्ये पुढे गेलेला चोर दानपेटीकडे वळतो आणि दानपेटीतील पैसे पिशवीत भरायला सुरुवात करतो. तोपर्यंत बाहेर राहिलेला चोर दरवाज्यावर तैनातीसाठी थांबतो.

1 लाख रुपये पळवले

दानपेटीतील जवळपास एक लाख रुपये चोरट्यांनी पळवले असल्याची माहिती मंदिरदाच्या पुजाऱ्यांनी दिली आहे. आता सीसीटीव्हीत दिसणाऱ्या इसमांचा माग काढला जात आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली असून दानपेटीवर डल्ला मारणाऱ्या चोरांचा तपास पोलीस करत आहेत.

इतर बातम्या-

गरीब मुस्लिम बांधवासोबत जे झालं, ते पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल! धारवाडमधील संतापजनक घटना

Photo Gallery | दोन मुलांची आई असलेल्या करीनाचा फिटनेस पाहून व्हाल आश्चर्य चकित

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?