नाशिकमध्ये अपघात; चारचाकी वाहनाने उडवले, दोन तरुण ठार

नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या निफाड (Nifad) तालुक्यातील पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) पोलीस ठाणे (Nashik Police) हद्दीत झालेल्या अपघातामध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. रानवड शिवारात हे दोन वेगवेगळे अपघात झाले असून, दोन्ही घटनेत चारचाकी वाहनाने मोटारसायकल स्वारांना उडवले आहे.

नाशिकमध्ये अपघात; चारचाकी वाहनाने उडवले, दोन तरुण ठार
अंबरनाथमध्ये भरधाव बसची दुचाकीस्वाराला धडक
Follow us
| Updated on: Sep 15, 2021 | 5:07 PM

नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या निफाड (Nifad) तालुक्यातील पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) पोलीस ठाणे (Nashik Police) हद्दीत झालेल्या अपघातामध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. रानवड शिवारात हे दोन वेगवेगळे अपघात झाले असून, दोन्ही घटनेत चारचाकी वाहनाने मोटारसायकल स्वारांना उडवले आहे. (Accident in Nashik; Two young men killed)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मंगळवारी ( 14 सप्टेंबर) रात्री आठच्या सुमारास रानवडहून पिंपळगावकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने एका मोटारसायकलला (एम.एच. 15 जी. एन. 1118) पाठीमागून धडक दिली. त्यात मोटारसायकलवरील आकाश सोमनाथ गिते (वय 24, रा. पालखेड) यांचा जागीच मृत्यू झाला. आकाश यांचे डोके, तोंड, दोन्ही हात व उजव्या पायास गंभीर जखमा झाल्या होत्या. अपघातानंतर वाहनचालकाने वाहन घेऊन पोबारा केला. दुसऱ्या घटनेत पिंपळगावहून रानवडे जाणाऱ्या पिकअप गाडीच्या (एम. एच. 15 बी. 2659) चालकाने समोरून येणाऱ्या मोटारसायकलला (एम. एच. 15 एफ. ए. 9773) जोरदार धडक दिली. यात घटनेत मोटारसायकलवरील संदीप शिवराम रसाळ (वय 32, रा. आहेरगाव) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रकला दिली मागून धडक

चांदवडहून धुळ्याला जाणाऱ्या दुचाकीवरील दोघांचा मालेगाव – धुळे रस्त्यावर मध्यरात्री एक वाजता अपघाती मृत्यू झाला. मालेगाव धुळे रस्त्यावरील हॉटेल ग्रीन प्लाझा समोर काही दिवसांपूर्वी हा अपघात घडला. दुचाकीस्वाराने चालत्या ट्रकला मागून जोराची धडक दिली. त्यात गंभीर मार लागल्याने दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला.

दुचाकीस्वारांचे अपघात सत्र

नाशिकमध्ये दुचाकीस्वारांचे अपघात सत्र थांबताना दिसत नाही. ऑगस्ट महिन्यात नऊ दुचाकीस्वारांचा वेगवेगळ्या अपघातांमध्ये मृत्यू झाला. विशेष म्हणजे मृत्युमुखी पडलेल्या नऊही दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातलेले नव्हते. त्यांनी हेल्मेट घातले असते, तर कदाचित त्यांचे प्राण वाचू शकले असते. हे अपघातसत्र थांबवण्यासाठी पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांना ताब्यात घेऊन त्यांना केंद्रावर नेत त्यांचे समुपदेशन करण्याची मोहीम सुरू केली आहे. या उपदेशाच्या डोसानंतर त्यांना एक प्रमाणपत्रही दिले जात आहे.

वाहतूक नियमांचे पालन नाही

नाशिकमध्ये वाहनधारक वाहतूक नियमांचे पालन करत नाहीत. मग तो चारचाकी वाहनधारक असो की, दुचाकी. सर्रासपणे राँगसाइड प्रवास करणे, दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास, हेल्मेट न घालणे, वेगमर्यादेचे उल्लंघन, सिग्नलचे नियम न पाळणे असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. (Accident in Nashik; Two young men killed)

इतर बातम्याः 

NashikRain:इगतपुरी, पेठ, सुरगाण्याला झोडपले; भात पिकाला जीवदान

नाशिकमधल्या मतदार याद्यांमध्ये घोळ; 2 लाख 87 हजार नावे दुबार

नारायण राणे यांचा जबाब पोलिस 25 सप्टेंबर रोजी ऑनलाइन नोंदविणार

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.