AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NashikRain:इगतपुरी, पेठ, सुरगाण्याला झोडपले; भात पिकाला जीवदान

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील इगतपुरी, (Igatpuri) पेठ, सुरगाण्याला गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने (Heavy rains) झोडपून काढले आहे. त्यामुळे धरणांच्या पाणी साठ्यात वाढ झाली असून, नद्यांना पूर आला आहे. भात पिकाला जीवदान मिळाले आहे.

NashikRain:इगतपुरी, पेठ, सुरगाण्याला झोडपले; भात पिकाला जीवदान
दारणा नदी तुडूंब भरल्याने शेतात पाणी शिरले आहे.
| Edited By: | Updated on: Sep 15, 2021 | 4:36 PM
Share

नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यातील इगतपुरी, (Igatpuri) पेठ, सुरगाण्याला गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने (Heavy rains) झोडपून काढले आहे. त्यामुळे धरणांच्या पाणी साठ्यात वाढ झाली असून, नद्यांना पूर आला आहे. संततधार पावसाने भात पिकालाही जीवदान मिळाले आहे. (Heavy rains at Igatpuri, Peth, Surgana)

इगतपुरी तालुक्यात मंगळवारी तब्बल 153.0 मिमी पावसाची नोंद झाली. पेठला 149,9 मिमी तर सुरगाण्याला 70 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील धरणे भरली आहेत. दारणा, भाम, भावली या नद्यांना पूर आला आहे. अप्पर वैतरणा धरणही भरले आहे. इगतपुरी तालुक्यातील अनेक भागात भाताचे पीक घेतले जाते. गेल्या काही दिवसांपासून या भागात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे भात पिकाला जीवदान मिळाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पेठ शहर आणि तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे दमणगंगा, नार, पार या नद्यांना पूर आला आहे. पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. सध्या पेठ तालुक्यातल्या बुरुंडी, खडकी, बिलकस, शेपुझरी या ठिकाणचे धबधबे ओसंडून वाहत आहेत. वाढती पाणीपातळी पाहता पर्यटकांनी या ठिकाणी येऊ नये. नदीवर पोहण्यास जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईचा पाणीप्रश्न मिटला

मुंबईला पाणीपुरवठा करणारे इगतपुरी तालुक्यातील सर्वात महत्त्वाचे अप्पर वैतरणा धरण तब्बल 98.70 टक्के भरले आहे. मंगळवारी (14 सप्टेंबर) हे धरण ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे तूर्तास मुंबईकरांचा पाणीप्रश्न मिटला आहे. वैतरणा धरण गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये भरले होते. यावर्षी त्याला भरण्यासाठी एक महिन्याचा उशीर लागला. मंगळवारी धरणाच्या तीन सांडव्याचे एक गेट उचलून 1865 क्यूसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सोबतच कालव्याद्वारे 450 क्यूसेक्सने विसर्ग सुरू आहे. धरण क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरण भरले आहे. अजूनही सप्टेंबरचा पूर्ण महिना आहे. परतीचा पाऊस सुरू झालेला नाही. आगामी काळात पुन्हा जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. हे पाहता परिसरातील धरणे काठोकाठ भरणार आहेत.

गोदावरीचा पूर ओसरला

नाशिक जिल्ह्यातील धरण क्षेत्रामध्ये गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण , दारणा धरण, नांदूर-मधमेश्वर प्रकल्प भरत आले आहेत. मुकणे, भाम, भावली, आळंदी अशी छोटी धरणे 100 टक्के भरली आहेत. पावसाचा जोर आणि भरलेली धरणे पाहता अपेक्षेप्रमाणे गोदावरी नदीला या वर्षीचा पहिला पूर आला. त्यामुळे गोदाघाट परिसरातील, रामकुंड येथील दुकाने हलविण्यात आली होती. मात्र, बुधवारी पुराचे पाणी ओसरले होते. (Nashik Rain: Heavy rains at Igatpuri, Peth, Surgana)

इतर बातम्याः

नाशिकमधल्या मतदार याद्यांमध्ये घोळ; 2 लाख 87 हजार नावे दुबार

नारायण राणे यांचा जबाब पोलिस 25 सप्टेंबर रोजी ऑनलाइन नोंदविणार

इगतपुरीत 5500 कोटींचा जलविद्युत प्रकल्प होणार; ‘जेएसडब्लू’ची राज्यातही 30 हजार कोटींची गुंतवणूक, 5000 नोकऱ्या मिळणार

...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.