AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NashikRain:नाशिक, खान्देशमध्ये पावसाचा जोर ओसरणार

नाशिक जिल्हा (Nashik district) आणि खान्देशात (Khandesh) आता पावसाचे प्रमाण कमी (no heavy rain) होण्याची शक्यता आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून या भागात पाऊस सुरू असून, धरणे तुडूंब भरली आहेत.

NashikRain:नाशिक, खान्देशमध्ये पावसाचा जोर ओसरणार
| Edited By: | Updated on: Sep 15, 2021 | 2:20 PM
Share

नाशिकः नाशिक जिल्हा (Nashik district) आणि खान्देशात (Khandesh) आता पावसाचे प्रमाण कमी (no heavy rain) होण्याची शक्यता आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून या भागात पाऊस सुरू असून, धरणे तुडूंब भरली आहेत. (There will be no heavy rain in Nashik and Khandesh)

गेल्या काही दिवसांपासून मान्सूनचा आस असलेले कमी दाबाचे क्षेत्र कायम होते. दक्षिण ते पश्चिमेपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र होते. त्यामुळे पावसाला पोषक वातावरण तयार झाले होते. बंगालचा उपसागर आणि गुजरातवरही कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते. त्यामुळे राज्यात दोन दिवस ठिकठिकाणी पाऊस झाला. आता या क्षेत्राची तीव्रता कमी झाली आहे. त्यामुळे आगामी चोवीस तासांत नाशिक जिल्हा आणि खान्देशात मोठ्या पावसाची शक्यता नाही. झालाच तर काही ठिकाणी तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये बुधवारी (15 सप्टेंबर) सकाळपासून पावसाची भुरभुर सुरू होती. दुपारपर्यंत ढगाळ वातावरण होते. दरम्यान, नाशिक जिल्ह्यावर सुरुवातीला रुसलेल्या पावसाने गेल्या आठ दिवसांपासून झोडपून काढले. त्यामुळे नांदगाव, मनमाडला न भूतो, न भविष्यती असा पाऊस झाला. वालदेवी नदीला पूर आला. नाशिकमध्ये गोदावरीला वर्षातला पहिला पूर आला आहे. अजूनही गेल्या दोन दिवसांपासून पावसाची हजेरी सुरू आहे. सोमवारी दिवसभर शहरात पावसाची रिपरिप सुरू होती. मंगळवारी सकाळीही पावसाने भुरभुर हजेरी लावली. दमदार पावसाने जिल्ह्यातील 24 पैकी 12 धरणांतून विसर्ग सुरू झाला आहे.

गोदावरीचा पूर ओसरला

नाशिक जिल्ह्यातील धरण क्षेत्रामध्ये गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण , दारणा धरण, नांदूर-मधमेश्वर प्रकल्प भरत आले आहेत. मुकणे, भाम, भावली, आळंदी अशी छोटी धरणे 100 टक्के भरली आहेत. पावसाचा जोर आणि भरलेली धरणे पाहता अपेक्षेप्रमाणे गोदावरी नदीला या वर्षीचा पहिला पूर आला. त्यामुळे गोदाघाट परिसरातील, रामकुंड येथील दुकाने हलविण्यात आली होती. मात्र, बुधवारी पुराचे पाणी ओसरले होते.

तूट भरून निघणार

नाशिक जिल्ह्यात गेल्यावर्षी 13 सप्टेंबरपर्यंत जवळपास 95.71 टक्के पाऊस झाला होता. यंदा 84.54 टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत जवळपास 15004.69 मिमी पावसाची अपेक्षा असतो. मात्र, यंदा सुरुवातीपासून पावसाने ओढ दिल्याने 13 सप्टेंबरपर्यंत 12684.8 मिमी पाऊस पडला. त्यामुळे अजूनही 11 टक्के पावसाची तूट आहे. मात्र, सप्टेंबर महिना पूर्ण होण्यास अजूनही पंधरा दिवस आहेत. अजूनही जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. त्यामुळे ही तूट भरून निघण्याची शक्यता आहे.

बंगालचा उपसागर आणि गुजरातवरही कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते. त्यामुळे राज्यात दोन दिवस ठिकठिकाणी पाऊस झाला. आता या क्षेत्राची तीव्रता कमी झाली आहे. त्यामुळे आगामी चोवीस तासांत नाशिक जिल्हा आणि खान्देशात मोठ्या पावसाची शक्यता नाही. झालाच तर काही ठिकाणी तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे. – श्रीनिवास औंधकर, संचालक, एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र, एमजीएम, औरंगाबाद (There will be no heavy rain in Nashik and Khandesh)

इतर बातम्याः

नाशिकमधल्या मतदार याद्यांमध्ये घोळ; 2 लाख 87 हजार नावे दुबार

इगतपुरीत 5500 कोटींचा जलविद्युत प्रकल्प होणार; ‘जेएसडब्लू’ची राज्यातही 30 हजार कोटींची गुंतवणूक, 5000 नोकऱ्या मिळणार

आईवर संशय घेणाऱ्या जन्मदात्या बापाचा दोन मुलांनी पोलिसासमोर भर रस्त्यात केला खून

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....