AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त पत्रासाठी 50 हजार, नाशिकमध्ये लाचखोर महिला शिक्षण अधिकाऱ्याच्या एसीबीने मुसक्या आवळल्या

नाशिकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजेच एसीबीने मोठी कारवाई केली आहे. एसीबीने नाशिक महापालिका शिक्षणाधिकारी सुनीता धनगर आणि एका शासकीय कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं आहे.

फक्त पत्रासाठी 50 हजार, नाशिकमध्ये लाचखोर महिला शिक्षण अधिकाऱ्याच्या एसीबीने मुसक्या आवळल्या
Follow us
| Updated on: Jun 02, 2023 | 10:19 PM

चैतन्य गायकवाड, Tv9 मराठी, नाशिक : नाशिकमध्ये एका महिला अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडल्याची घडना समोर आलेली. संबंधित प्रकरण राज्यभरात गाजलं होतं. पण तरीही काही अधिकारी या घटनांमधून काहीच बोध घेताना दिसत नाहीय. भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांकडून अजूनही लाच मागण्याचे प्रकार समोर येत आहेत. नाशिकमध्ये पुन्हा तसाच प्रकार समोर आला आहे. एका महिला शिक्षण अधिकाऱ्याने एका सस्पेंड मुख्याध्यापकाकडे पत्र पाठवण्यासाठी तब्बल 50 हजार रुपयांची लाच मागितली. त्यामुळे संबंधित शिक्षण अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकली आहे. एसीबीने सापळा रचत या महिला अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत.

नाशिकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजेच एसीबीने मोठी कारवाई केली आहे. एसीबीने नाशिक महापालिका शिक्षणाधिकारी सुनीता धनगर आणि एका शासकीय कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं आहे. एसीबीने दोघांना अटक केली आहे. एसीबीच्या पथकाकडून तब्बल 50 हजार रुपयांची लाच घेताना ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या अधिक चौकशीसाठी सुनीता धनगर यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

विशेष म्हणजे महापालिकेत लाचलुचपत विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. तक्रारदार सस्पेंड मुख्याध्यापकाला कामावर रुजू करण्यासाठी लागणारे पत्र देण्यासाठी ५० हजारांची लाच मागितली होती, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. याप्रकरणी शिक्षणाधिकारी धनगर यांना 45 हजार, तर त्यांचा लिपिकाला 5 हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

तक्रारदार हे एका शैक्षणिक संस्थेमध्ये मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. त्यांना सदरील संस्थेने बडतर्फ केले आहे. त्याकामी त्यांनी शैक्षणिक न्यायाधिकरण नाशिक येथे दाद मागितल्याने त्यांच्यावरील बडतर्फीच्या कारवाईस स्थगिती देण्यात आली होती. तरी देखील सदर संस्था मुख्यध्यापकांना सेवेमध्ये दाखल करून घेत नसल्याने त्यांनी यातील पहिल्या आरोपी शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्याकडे सदरील संस्थेवर कारवाई करण्यासाठी अर्ज केला होता.

त्याकरिता यातील धनगर यांनी पत्र देण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारली. तसेच या प्रकरणातील दुसरा आरोपी लिपीक नितीन जोशी याने पत्र बनवण्याच्या मोबदल्यात 5 हजार रुपयांची लाच मागणी केली. नंतर त्यांनी लाचेची रक्कम स्वीकारली म्हणून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती मिळत आहे.

'त्या' 10 मिनिटांमुळे आज जिवंत, गुजरातच्या तरूणीनं सांगितलं काय घडलं?
'त्या' 10 मिनिटांमुळे आज जिवंत, गुजरातच्या तरूणीनं सांगितलं काय घडलं?.
PM मोदींनी अहमदाबादच्या दुर्घटनास्थळाची केली पाहणी अन्..
PM मोदींनी अहमदाबादच्या दुर्घटनास्थळाची केली पाहणी अन्...
एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लॅंडींग, मोठं कारण आलं समोर
एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लॅंडींग, मोठं कारण आलं समोर.
विमान दुर्घटनेत बचावलेल्या प्रवाशाचा अंगावर काटा आणणारा अनुभव
विमान दुर्घटनेत बचावलेल्या प्रवाशाचा अंगावर काटा आणणारा अनुभव.
विमान दुर्घटनेतल्या वस्तीगृहातल्या विद्यार्थ्यांनी सांगितली आँखों देखी
विमान दुर्घटनेतल्या वस्तीगृहातल्या विद्यार्थ्यांनी सांगितली आँखों देखी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मृतांच्या नातेवाईकांना भेटले
पंतप्रधान नरेंद्र मोदी मृतांच्या नातेवाईकांना भेटले.
मृतांच्या 192 नातेवाईकांच्या DNA चाचण्या पूर्ण
मृतांच्या 192 नातेवाईकांच्या DNA चाचण्या पूर्ण.
लकी नंबरनेच केला रुपाणींचा घात, त्याच तारखेला मृत्यूने कवटाळलं
लकी नंबरनेच केला रुपाणींचा घात, त्याच तारखेला मृत्यूने कवटाळलं.
अहमदाबाद विमान दुर्घटनेवर राज ठाकरेंनी उपस्थित केले मोठे प्रश्न..
अहमदाबाद विमान दुर्घटनेवर राज ठाकरेंनी उपस्थित केले मोठे प्रश्न...
टेकऑफ नंतर काही क्षणात विमान मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहावर कोसळलं अन्...
टेकऑफ नंतर काही क्षणात विमान मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहावर कोसळलं अन्....