नाशिक हादरले! किरकोळ वादातून तरुणाची हत्या; आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात

नाशिक शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणातून दोन जणांवर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला, या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर अन्य एका जखमीवर रुग्णलयात उपचार सुरू आहेत.

नाशिक हादरले! किरकोळ वादातून तरुणाची हत्या; आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात
| Edited By: | Updated on: Dec 25, 2021 | 7:27 AM

नाशिक :  शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणातून दोन जणांवर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला, या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर अन्य एका जखमीवर रुग्णलयात उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी दोन गटांमध्ये वाद झाला होता, त्याचा राग मनात धरूनच हा हल्ला करण्यात आल्यांचा अंदाज आहे. दरम्यान संंबंधित हल्लेखोरांना ताब्यात घेतले असून, चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. व्यंकटेश शर्मा असे या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर बाळा मंडलिक यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पूर्वी झालेल्या भांडणातून हल्ला

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकच्या पंचवटी परिसरात असलेल्या हिरावाडीमध्ये हा प्रकार घडला आहे. हिरावाडी परिसरामध्ये दोन तरुण उभे होते, याचवेळी धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला पूर्वी झालेल्या वादाचाी पार्श्वभूमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दोन गटामध्ये 15 दिवसांपूर्वी भांडणे झाली होती. त्यानंतर हा वाद मिटला होता. मात्र पुन्हा एकदा हल्लेखोर आणि हे तरुण समोरासमोर आल्याने वादाला तोंड फुटले. वादाचे पर्यावसन मारहाणीत झाले. मारहाणीदरम्यान टोळक्याने या तरुणांवर चाकूने हल्ला केला.

आरोपींना घेतले ताब्यात

चाकू हल्ल्यामध्ये हे तरुण गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपाचारादरम्यान व्यंकटेश शर्मा यांचा मृत्यू झाला तर बाळा मंडलिक यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या हल्ल्यामध्ये सहभागी सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

संबंधित बातम्या

Nagpur Crime | जीवन नकोसे झाले! विष घेऊन गळफास; 20 दिवस व्हेंटिलेटवर तरीही तुटली नाही आयुष्याची दोरी

कोरोना लसीकरणाचे बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; दोन आरोपींना मुंबईतून अटक

गाडीवर हवा व्हिआयपी 9 नंबर धंदा मात्र 2 नंबर, पेपरफुटी घोटाळ्यातील मुख्य आरोपीचा राजेशाही थाट