कोरोना लसीकरणाचे बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; दोन आरोपींना मुंबईतून अटक

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे बनावट सर्टिफिकेट बनवून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 5 ने ही कारवाई केली. या प्रकरणात दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

कोरोना लसीकरणाचे बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; दोन आरोपींना मुंबईतून अटक
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 25, 2021 | 6:35 AM

मुंबई: कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे बनावट सर्टिफिकेट बनवून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 5 ने ही कारवाई केली. या प्रकरणात दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. जुबेर शेख आणि अल्फैज खान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ते सध्या मुंबईच्या वडाळा भागात राहत असून, आरोपी हे मुळचे उत्तर प्रदेशातील प्रतापगढ येथील रहिवासी आहेत.

पोलिसांनी पाठवला बनावट ग्राहक

या कारवाईबाबत बोलताना कुर्ला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशांक शेळके यांनी सांगितले की,जुबेर नावाचा व्यक्ती कुर्ला परिसरामध्ये बनावट कोरोना लसीकरण प्रमाणपत्राचे वाटप करत आहे. ज्या लोकांनी लसीचा एकही डोस घेतला नाही, त्यांना पैशांच्या मोबदल्यात दोन्ही डोस घेतल्याचे सर्टिफिकेट देण्यात येत आहे. अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांनी आरोपींकडे एक बनावट ग्राहक पाठवला, त्याने प्रमाणपत्राची मागणी केली. त्य़ाला प्रमाणपत्र देण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. तुम्ही मला फक्त तुमचा मोबाई नंबर, आधारकार्ड नंबर आणि  दोन हजार रुपये द्या, मी तुम्हाला प्रमाणपत्र देतो असे आरोपीने संबंधित व्यक्तीला सांगितले. बनावट प्रमाणपत्र देत असल्याची खात्री पटताच पोलिसांनी आरोपी जुबेर याला अटक केली.

तपास सुरू असल्याची पोलिसांची माहिती

दरम्यान जुबेरची चौकशी सुरू असताच अल्फैजचे नाव या प्रकरणात समोर आले. पोलिसांनी दुसार आरोपी अल्फैज याला वडाळा परिसरातून अटक केली आहे. हे दोन्ही आरोपी मुळ उत्तर प्रदेशातील प्रतापगढ येथील रहिवासी आहेत. दरम्यान आता या टोळीने कोणाकोणाला बनावट प्रमाणपत्रे वाटली, या टोळीमध्ये आणखी कोणाचा समावेश आहे का? याच तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संबंधित बातम्या 

गाडीवर हवा व्हिआयपी 9 नंबर धंदा मात्र 2 नंबर, पेपरफुटी घोटाळ्यातील मुख्य आरोपीचा राजेशाही थाट

Tet Exam scam : टीईटी पेपर फुटीचा सूत्रधार सुपेच्या घरी सापडले कोट्यावधींचे घबाड, आकडा वाचून तुम्हीही थक्क व्हाल

Pune crime | … अन घरफोडी करायला विमाने पुण्यात यायचे ,चोरी करून विमानाने परत जायचे ;वाचा सविस्तर

Non Stop LIVE Update
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात.