AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरासमोरूनच बांधकाम व्यावसायिकाचं अपहरण, अपहरणकर्ते फिल्मी स्टाईलने आले आणि फिल्मी स्टाईलने गेले; नाशिकमध्ये खळबळ

नाशिकमध्ये काल रात्री फिल्मी स्टाईल थरार पाहायला मिळाला. एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचं त्याच्या घरासमोरूनच अपहरण करण्यात आलं आहे. फिल्मी स्टाईलनेच हे अपहरण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

घरासमोरूनच बांधकाम व्यावसायिकाचं अपहरण, अपहरणकर्ते फिल्मी स्टाईलने आले आणि फिल्मी स्टाईलने गेले; नाशिकमध्ये खळबळ
Hemant ParakhImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Sep 03, 2023 | 8:25 AM
Share

नाशिक | 3 सप्टेंबर 2023 : राज्यात सातत्याने गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. त्या इतक्या वाढल्यात की आता गुन्हेगारांची भीती मेली आहे. हे गुन्हेगार आता दिवसाढवळ्याही गुन्हे करण्यास धजावत आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. राज्यातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरणही निर्माण झाली आहे. नाशिकमध्ये तर गुन्हेगारीची हद्दच झाली आहे. काल काही गुंडांनी नाशिकमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचं अपहरण केलं आहे. फिल्मी स्टाईलने आलेल्या या गुंडांनी बांधकाम व्यावसायिकाचं त्यांच्या घरासमोरूनच अपहरण केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

नाशिकचे सुप्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक हेमंत पारख यांचे अपहरण झाले आहे. हेमंत पारख गजरा ग्रुपचे चेअरमन आहेत. नाशिकमधील प्रतिष्ठीत व्यक्ती आणि सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक म्हणून त्यांची ख्याती आहे. मात्र, त्यांचंच अपहरण झाल्याने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे इंदिरानगर येथील राहत्या घरासमोरून पारख यांचं अपहरण करण्यात आलं आहे. घरासमोर येऊन गुंडांकडून प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचं अपहरण केलं जात असेल तर इतरांचं काय? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.

फिल्मी स्टाईल अपहरण

शनिवारी रात्री 9 वाजून 40 मिनिटांनी अज्ञात इसम पारख यांच्या घरासमोर आले. हे गुंड चारचाकी आणि दुचाकीवरून आले होते. आल्या आल्या त्यांनी हेमंत पारख यांना चारचाकीत कोंबले आणि सुसाट वेगाने पळून गेल्याचे सांगितलं जात आहे. पारख यांचं अपहरण झाल्याचं कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.

कुटुंबालाही धक्का

पारख यांचं अपहरण झाल्याची बातमी नाशिकमध्ये वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे नाशिककर चांगलेच हादरून गेले आहेत. गुंड घरासमोर येऊन अपहरण करत असल्याने नाशिककरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तर आपल्या घरासमोरूनच घरच्या व्यक्तीचं अपहरण झाल्याचं ऐकून पारख कुटुंबालाही धक्का बसला आहे.

पोलिसांकडून शोध सुरू

पारख यांचा अजूनही शोध लागलेला नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी केली. अनेकांची साक्ष घेतली. सीसीटीव्हीही तपासून पाहण्याचं काम सुरू आहे. शहरात अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. मात्र, रात्र उलटून गेली तरी पारख यांचा शोध न लागल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अखेर अपहरणकर्ते पारख यांना घेऊन कुठे गेले? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.

पूर्ववैमन्यस्यातून अपहरण?

दरम्यान, या अपहरण प्रकरणाचा पोलीस प्रत्येक अँगलने तपास करत आहे. पारख यांचं अपहरण पूर्व वैमन्यस्यातून झाले का? त्यांची कुणाशी दुश्मनी होती का? त्यांना अलिकडच्या काळात कुणी धमकी दिली होती का? त्यांची कुणाशी बाचाबाची झाली होती का? आदी अँगलने पोलीस तपास करत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Follow Us
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा टाकताच...
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
Video | माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यूचा थरार! पहा व्हिडीओ
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल