Jalgaon Accident : भीषण कार अपघातात गटविकास अधिकाऱ्यावर काळाचा घाला

पहाटेच्या सुमारास भरधाव कार ट्रकला धडकून मोठा अपघात

Jalgaon Accident : भीषण कार अपघातात गटविकास अधिकाऱ्यावर काळाचा घाला
भीषण अपघातImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 23, 2022 | 12:32 PM

जळगाव : भोणे फाट्याजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात (Jalgaon Accident) झाला. या अपघातामध्ये गटविकास अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. कारने नाशिककडे (Nashik) जात असतेवेळी गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी (Eknath Choudhari) यांच्यावर काळानं घाला घातला. एकनाथ चौधरी यांच्या अपघाती मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जातेय. या अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झाला. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या अपघातानंतर एकच गोंधळ उडाला होता.

एकनाथ चौधरी हे सरकारी कामासाठी नाशिककडे जाण्यासाठी निघाले होते. वाटेत धरणगाव तालुक्यातील भोणे फाट्यावर त्यांची कार अपघातग्रस्त झाली. कार आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. यात एकनाथ चौधरी यांचा मृत्यू झाला.

एकनाथ चौधरी हे अमळनेर येथे गटविकास अधिकारी पदावर कार्यरत होते. तसंच यावल येथील गटविकास अधिकारी म्हणून ही त्यांच्याकडे पदभार होता. मात्र पहाटे झालेल्या भीषण अपघातात एकनाथ चौधरी यांचा जागीच जीव गेला. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य केलं.

या अपघाताची पोलिसांनीही नोंद घेतली आहे. दरम्यान, एकनाथ चौथरी यांच्या अपघाती मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. MH 19 DV 4199 या महिंद्रा XUV 300 कारने एकनाथ चौधरी हे नाशिकच्या दिशेने निघाले होते. पण वाटेत त्यांची कार डाव्या बाजूने जोरात ट्रकला धडकली.

ही धडक इतकी जबर होती की, कारचा डाव्या बाजूचा भाग पूर्णपणे चेपला. तसंच समोरची काचही फुटली. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर रस्त्यावरुन अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला हटवण्यात आली. या अपघातामुळे रस्ते अपघातांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.

Non Stop LIVE Update
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.