Jalgaon Murder : भाडेकरुच्या बायकोसोबत घरमालकाचे अनैतिक संबंध, पुढे घडलं धक्कादायक हत्याकांड

ड्युटीवरुन घरी जाण्यासाठी निघाला पण दोन दिवस झाले तरी परतलचा नाही, अखेर डेडबॉडीच सापडली! कुठे?

Jalgaon Murder : भाडेकरुच्या बायकोसोबत घरमालकाचे अनैतिक संबंध, पुढे घडलं धक्कादायक हत्याकांड
जळगावमधील धक्कादायक घटनाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Dec 13, 2022 | 7:48 AM

किशोर पाटील, प्रतिनिधी, जळगाव : जळगाव शहरातील मेहरूण येथे राहणाऱ्या तरूणाचा धारदार हत्यार आणि दगडाने वार करून निर्घृण खून केल्याचा धक्कादायक घटना सोमवारी समोर आली. प्रमोद उर्फ भूषण सुरेश शेट्टी (वय-३३) रा. मेहरूण, जळगाव असे मृत तरूणाचे नाव आहे. भाड्याने घरात राहणाऱ्या विवाहितेसोबत असलेल्या अनैतिक संबंधातून हा खून झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी घरमालक तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. जळगाव पोलीस याप्रकरणी आता अधिक तपास करत असून दोघा जणांना या तरुणाच्या हत्येप्रकरणी अटकही करण्यात आली आहे.

दोन दिवसांपासून प्रमोद नावाचा तरुण बेपत्ता होता. त्याचा मृतदेह निमखेडी शिवारातील गिरणा नदीच्या काठावरील महादेव मंदीराजवळ आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली.

प्रमोद शेट्टी हा नेहमीप्रमाणे ड्युटी आटोपून घरी येण्यासाठी निघाला. पण दोन दिवस उलटूनही तो घरी परतला नाही. याच दरम्यान पोलिसांनी चौकशी केल्यावर त्याचा मृतदेह सोमवारी गिरणा नदीच्या काठावरील महादेव मंदीराजवळ आढळून आला.

एमआयडीसी पोलिसांनी खून करणाऱ्या संशयिताबद्दल माहिती काढली असता आरोपी जंगलात लपून बसल्याचं समोर आलं. दोघेही आरोपी जळगाव तालुक्यातील उमाळा येथील जंगलात लपून बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी खून करणाऱ्या सत्यराज नितीन गायकवाड, वय 26 रा. गणेश नगर, जळगाव, सुनिल लियामतखाँ तडवी, वय 26 , रा. पंचशील नगर, फुकटपुरा, तांबापुरा, जळगाव या दोघांना अटक केली.

पुढील कारवाईसाठी दोघांना जळगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. कट रचून दोघांनी नियोजनबद्ध पद्धतीने हा खून केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. आता नितीन आणि सुनिल या दोघांचीही कसून चौकशी केली जातेय. हत्येच्या या घटनेनं जळगाव शहरात खळबळ माजलीय.

Non Stop LIVE Update
रत्नागिरीला रेड, या 11 जिल्ह्याना ऑरेंज अलर्ट, यात तुमच्या जिल्हा आहे?
रत्नागिरीला रेड, या 11 जिल्ह्याना ऑरेंज अलर्ट, यात तुमच्या जिल्हा आहे?.
जरांगेंच्या इशाऱ्यानंतर शेंडगेंची चिथावणी, कुकरी-कोयत्यावरून नवा वाद?
जरांगेंच्या इशाऱ्यानंतर शेंडगेंची चिथावणी, कुकरी-कोयत्यावरून नवा वाद?.
शाही लग्नात खास पाहुण्यांना 2 कोटींचं रिटर्न गिफ्ट, नेमकं काय आहे खास?
शाही लग्नात खास पाहुण्यांना 2 कोटींचं रिटर्न गिफ्ट, नेमकं काय आहे खास?.
कल्याणमध्ये पावसाची तुफान बॅटिंग अन् रस्त्याची नदी; 'या' महामार्ग ठप्प
कल्याणमध्ये पावसाची तुफान बॅटिंग अन् रस्त्याची नदी; 'या' महामार्ग ठप्प.
बस स्थानक की स्विमींग पूल, तुफान पावसानं रायगडला झोडपलं, बघा व्हिडीओ
बस स्थानक की स्विमींग पूल, तुफान पावसानं रायगडला झोडपलं, बघा व्हिडीओ.
‘लाडकी बहीण’च्या अर्जास उशीर, काळजी करू नका कारण... दादांची मोठी घोषणा
‘लाडकी बहीण’च्या अर्जास उशीर, काळजी करू नका कारण... दादांची मोठी घोषणा.
पवारांचा सर्वपक्षीय बैठकीला खोडा, बारामतीत फोन अन्...; भुजबळांचा आरोप
पवारांचा सर्वपक्षीय बैठकीला खोडा, बारामतीत फोन अन्...; भुजबळांचा आरोप.
ब्रेक फेल कंटेनरची 6-7 वाहनांना धडक अन् कंटनेर नाल्यात झाला पलटी
ब्रेक फेल कंटेनरची 6-7 वाहनांना धडक अन् कंटनेर नाल्यात झाला पलटी.
जरांगे या भुताला बाटलीत बंद करून समुद्रात फेका, कुणी केली खोचक टीका?
जरांगे या भुताला बाटलीत बंद करून समुद्रात फेका, कुणी केली खोचक टीका?.
मान्सून पिकनिकला लोणावळ्यातील भुशी डॅमवर जाताय? तर थोडं थांबा, कारण...
मान्सून पिकनिकला लोणावळ्यातील भुशी डॅमवर जाताय? तर थोडं थांबा, कारण....