AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओढणीने गळा आवळून हॉटेलमध्ये पत्नीची हत्या, नाशकात पतीला अटक

संशयित आरोपी पोपट वीर याने पत्नी ज्योती हिचा ओढणीने गळा आवळून खून केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. संशयित आरोपी पोपट वीर याला नाशिक रोड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत

ओढणीने गळा आवळून हॉटेलमध्ये पत्नीची हत्या, नाशकात पतीला अटक
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: Anish Bendre | Updated on: Sep 29, 2021 | 11:38 AM
Share

नाशिक : पतीनेच पत्नीची हॉटेलमध्ये हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. किरकोळ भांडणातून पतीने ओढणीने गळा आवळून पत्नीचा खून केल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

नाशिकमध्ये पतीने पत्नीची किरकोळ वादातून गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली आहे. नाशिक शहरातील बिटको चौकातील हॉटेल पवनमध्ये रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला.

ओढणीने गळा आवळून खून

संशयित आरोपी पोपट वीर याने पत्नी ज्योती हिचा ओढणीने गळा आवळून खून केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. संशयित आरोपी पोपट वीर याला नाशिक रोड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे.

विरारमध्ये क्षुल्लक कारणावरुन पत्नीची हत्या

दरम्यान, घराजवळ कपडे वाळत घालण्यावरुन शेजाऱ्यांशी चाललेल्या वादात साथ न दिल्यामुळे पतीने पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईजवळच्या विरार पूर्व भागात राहणाऱ्या 28 वर्षीय विवाहितेची पतीनेच हत्या केल्याचा प्रकार काल उघडकीस आला होता. त्यानंतर चौकशीदरम्यान हत्येचं चक्रावून टाकणारं कारण समोर आलं आहे. पतीने रविवारी रात्री माहेरी येऊन केलेल्या हल्ल्यात पत्नीला प्राण गमवावे लागले, तर सासू गंभीर जखमी झाली आहे. आरोपी पतीचा शोध सुरु आहे.

विरारमधील कॉम्प्लेक्समध्ये थरार

मयत सुप्रिया जगदिश गुरव (वय 28 वर्ष) आणि तिचा पती जगदिश हे वसई रेल्वे स्थानकाबाहेर तिकीट विक्री करणाऱ्या एका खासगी कंपनीत काम करत होते. सुप्रियाची 47 वर्षीय आई सुषमा शेट्टी यांच्या राहत्या घरी रविवारी रात्री 9 वाजता हा प्रकार घडला. सुषमा शेट्टी विरारमधील नरेंद्र ब्रह्म कॉम्प्लेक्समध्ये पहिल्या मजल्यावरील रूम नंबर 106 मध्ये राहतात. तर जावई जगदिश आणि मुलगी सुप्रिया जवळच भाड्यावर घर घेऊन राहतात.

शेजाऱ्यांसोबत वाद

जगदिशच्या घरासमोर त्यांच्या शेजाऱ्यांनी कपडे वाळत घातल्यामुळे दोघांचा मोठा वाद झाला. यावेळी जगदिशने माहेरी गेलेल्या सुप्रियाला फोन केला आणि भांडण्यासाठी बोलावलं. मात्र कामात व्यस्त असल्यामुळे तिने घरी येण्यास नकार दिला. बायकोने दिलेल्या नकारामुळे जगदिशचा पारा चढला आणि तो तडक तिच्या माहेरी येऊन थडकला.

बायकोला भोसकलं, सासूवरही वार

तिथे येऊन त्याने बायको आणि सासूला शिवीगाळ केली. सासूने त्याला प्रत्युत्तर केलं असता जावई जगदिशने तिचं डोकं भिंतीवर आपटलं. हे पाहून सुप्रियाने जगदिशला ढकललं. मात्र जगदिशने स्वयंपाकघरात जाऊन चाकू आणला आणि तिच्या छातीत खुपसला. सासूने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, त्याने तिच्याही हातावर सुरीने वार केले आणि तो घटनास्थळावरुन पसार झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सासू गंभीर जखमी

मायलेकीचा आरडाओरडा ऐकून त्यांचे शेजारी धावत आले. त्यांनी गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या सुप्रिया आणि सुषमा या दोघींना जवळच्या सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये नेलं. मात्र डॉक्टरांनी सुप्रियाला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केलं. तर सुषमाला संजीवनी हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे.

आरोपी पतीला दारुचे व्यसन

2020 मध्ये पतीच्या निधनानंतर सासू सुषमा शेट्टी घरकाम करतात. सुप्रिया, जगदिश आणि त्यांची तीन मुलं आधी त्यांच्यासोबतच राहत होती. मात्र नंतर ते भाड्याच्या खोलीत राहायला गेले. जावई जगदिश दारुच्या आहारी गेल्याची माहितीही सुषमा यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात दिली. विरार पोलीस ठाण्यात कलम 302 प्रमाणे हत्येचा गुन्हा दाखल केला असून, आरोपी पतीच्या शोधासाठी 2 विशेष पथके तयार करून रवाना केले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

कपडे वाळत घालण्याचा वाद, शेजाऱ्यांशी भांडायला बायको आली नाही, नवऱ्याने माहेरी जाऊन भोसकलं

पाच मुलांच्या आईचा तरुणावर जडला जीव, प्रियकराच्या साथीने पतीची हत्या

प्रियकराच्या साथीने पतीची हत्या, मुलीने पोलिसांना सांगितलं बाबांना किचनमध्ये पुरलंय!

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा