AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाळाची हत्या करुन आईची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिलं…

नाशिकमध्ये बाळाची हत्या केल्यानंतर आईने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. आत्महत्येचं कारण मात्र अद्याप स्पष्ट नाही. पोलिसांना सुसाईड नोट आढळली आहे

बाळाची हत्या करुन आईची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिलं...
बाळाची हत्या करुन महिलेची आत्महत्या
| Edited By: | Updated on: Aug 10, 2021 | 8:54 AM
Share

नाशिक : बाळाची हत्या करुन आईने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. महिलेसोबतच बाळाचाही मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र महिलेच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी परिसरात ही धक्कादायक घटना घडली. बाळाची हत्या केल्यानंतर आईने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. आत्महत्येचं कारण मात्र अद्याप स्पष्ट नाही. पोलिसांना सुसाईड नोट आढळून आली आहे. मात्र सुसाईड नोटमध्ये या घटनेसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असा उल्लेख करण्यात आल्याची माहिती आहे.

दोन मुलांच्या हत्येनंतर आईची आत्महत्या

दरम्यान, दोन चिमुकल्या मुलांची हत्या करुन महिलेने गळफास घेतल्याची घटना नुकतीच राजस्थान राज्यातील बाडमेरमध्ये उघडकीस आली होती. सहा वर्षांची मुलगी आणि तीन वर्षांच्या मुलाचा जीव घेऊन विवाहितेने स्वतःचंही आयुष्य संपवलं. हुंड्याच्या दबावातून होणाऱ्या त्रासाला कंटाळून बहिणीने सामूहिक आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या भावाने केला आहे. पोलिसांनी तिघांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवून पुढील तपास सुरु केला आहे.

नेमकं काय घडलं होतं?

राजस्थान राज्यातील बाडमेर जिल्ह्यातील वाकलपुरा पोलीस ठाण्याअंतर्गत ही घटना घडली होती. रसाल कंवर हिचा विवाह सात वर्षांपूर्वी माधव सिंहसोबत झाला होता. माधव ट्रक चालक आहे. माधव आणि रसाल यांना सहा वर्षांची जसू ही मुलगी आणि तीन वर्षांचा विक्रम हा मुलगा आहे. शनिवारी दुपारी बारा वाजेपर्यंत जेव्हा रसाल कंवरच्या घरातून कुठलीही हालचाल जाणवली नाही, त्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी खिडकीतून घरात डोकावून पाहिलं असता, त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. रसाल आणि तिची दोन्ही मुलं गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली.

संबंधित बातम्या :

नऊ दिवसांपूर्वीच लग्न, माहेरी येऊन विवाहितेची प्रियकरासोबत आत्महत्या

दुपारपर्यंत घरात शांतता, शेजाऱ्यांनी डोकावून पाहिलं, तर दोन चिमुकल्यांसह महिला गळफास घेतलेल्या अवस्थेत

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.