Malegaon Crime : रिक्षात चक्क घरगुती सिलिंडरचा गॅस भरला! मालेगावातील धक्कादायक प्रकार

| Updated on: May 03, 2022 | 7:32 AM

मालेगाव शहरात अनेक ठिकाणी नागरीवस्तीत सर्रासपणे प्रवाशी वाहतूक करणाऱ्या रिक्षांमध्ये घरगुती गॅसचे इंधन भरलं जात आसल्याची धक्कादायक बाब समोर आली.

Malegaon Crime : रिक्षात चक्क घरगुती सिलिंडरचा गॅस भरला! मालेगावातील धक्कादायक प्रकार
धक्कादायक प्रकार
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मालेगाव : पेट्रोल डिझेलचे (Petrol Diesel Rates Today) दर आवाक्या बाहेर गेले आहेत. महागलेल्या दरांचा परिणाम वाहनचालकांसह सर्वसामान्यांवरही झालेला आहेच. अशात नियमित वाहतूक करणाऱ्यांचं तर संपूर्ण बजेट वाढलेल्या इंधन दरानं मोडलेलं आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा (Auto Rikshaw) चालकांना वाढलेल्या इंधन दरवाढीचा मोठा फटका बसलाय. यावर मालेगावातील काही जणांनी शोधून काढलेला धक्कादायक उपाय जीवघेणाही ठरण्याची भीती व्यक्त केली जातेय. रिक्षामध्ये चक्क घरगुती गॅस (Non Commercial LPG) सिलिंडर भरला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मालेगाव पोलिसांनी कारवाई देखील केली. या कारवाईमध्ये एकूण 30 घरगुती सिलिंडर जप्त करण्यात आलेत. वाढत्या इंधनावर तोडगा निघत नसल्यानं मालेगावातील रिक्षा चालकांनी घरगुती गॅस सिलिंडर भरण्यास सुरुवात केली. मात्र घरगुती गॅस सिलिंडर रिक्षात भरणं, अत्यंत धोकादायक असल्याचं जाणकारांनी म्हटलंय. पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर आता रिक्षा चालकही सतर्क झाले आहेत. मात्र नियम धाब्यावर बसवून अशाप्रकारे गॅस भरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय.

गॅसचा काळाबाजार

मालेगाव शहरात अनेक ठिकाणी नागरीवस्तीत सर्रासपणे प्रवाशी वाहतूक करणाऱ्या रिक्षांमध्ये घरगुती गॅसचे इंधन भरलं जात आसल्याची धक्कादायक बाब समोर आली. स्थानिक गुन्हे शाखेने याप्रकरणी कारवाई करीत 30 गॅस सिलेंडरसह मोटर मशीनही जप्त केली आहे. हा काळाबाजार करणाऱ्या आरोपीलाही पोलिसांनी अटक केली आहे.

जीवघेणा तोडगा

मालेगाव शहरातील भरवस्तीत असलेल्या सरदार चौकात चक्क एका टपरीत मोटरच्या सहाय्याने रिक्षात गॅस भरुन दिला जात होता. दाट लोकवस्तीचा हा परिसर असताना देखील शासनाचे नियम धाब्यावर ठेवून रिक्षामध्ये गॅस भरला जात होता. याबाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाई करीत अनेक घरगुती वापराचे गैस सिलेंडर आणि काही सामग्री जप्त केली.

मात्र इंधनाचे दर वाढलेत म्हणून रिक्षा चालकांनी हा जो जीवघेणा व्यवहार सुरु केल्याचं बोललं जातंय. त्यामुळे या प्रवासी रिक्षांमधून जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. सरदार चौकात असलेल्या एका दुकानात सर्रासपणे रिक्षामध्ये गॅस भरुन दिला जात असल्याचंही समजतंय.