राज्यमंत्री बच्चू कडूंची नाशिक कोर्टात हजेरी, महापालिकेच्या तत्कालीन आयुक्तांवर हात उगारल्याचा आरोप

| Updated on: Jul 16, 2021 | 2:30 PM

2017 मध्ये सरकारी कामात अडथळा आणत बच्चू कडू तत्कालीन नाशिक महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या अंगावर धावून गेले होते. शिवीगाळ करत कडू यांनी अभिषेक कृष्णा यांच्यावर हात उगारल्याचा आरोप आहे.

राज्यमंत्री बच्चू कडूंची नाशिक कोर्टात हजेरी, महापालिकेच्या तत्कालीन आयुक्तांवर हात उगारल्याचा आरोप
Bachchu Kadu
Follow us on

नाशिक : शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) नाशिकच्या न्यायालयात हजर झाले आहेत. नाशिक महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यावर हात उगारल्या प्रकरणी कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या संदर्भात बच्चू कडू यांनी कोर्टात हजेरी लावली असून सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

2017 मध्ये सरकारी कामात अडथळा आणत बच्चू कडू तत्कालीन नाशिक महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या अंगावर धावून गेले होते. शिवीगाळ करत कडू यांनी अभिषेक कृष्णा यांच्यावर हात उगारल्याचा आरोप आहे. त्यावेळी आमदारपदी असलेल्या बच्चू कडू यांच्यावर नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करुन त्यांना अटकही करण्यात आली होती. या प्रकरणी बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

नेमकं काय घडलं होतं?

24 जुलै 2017 रोजी नाशिक महापालिकेवर प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु होते. आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने तत्कालीन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. यावेळी बच्चू कडू यांचा संयम सुटला आणि ते आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या अंगावर धावून गेले. त्यांनी आयुक्तांना शिवीगाळ करत त्यांच्यावर हात उगारल्याचा दावा केला जातो. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी आयुक्त अभिषेक कृष्णा यांना संरक्षण देत आमदार बच्चू कडू यांना बाजूला केले होते.

आंदोलन कशासाठी?

नाशिक महापालिकेकडून दिव्यांग व्यक्तींसाठी तीन टक्के राखीव निधी खर्च केला जात नाही तसेच 1995 चा अपंग पुनर्वसन कायदा महापालिकेने अंमलात आणला नसल्याचा आरोप करत प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या मुख्यालयासमोर आधी धरणे आंदोलन करण्यात आले होते.

संबंधित बातम्या :

VIDEO: चिमुकलीचा घरासाठी थेट बच्चू कडू यांना फोन, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

बच्चू कडूंचा वाढदिवस, बेघर अपंगाला घर आणि सायकल, रामदासांना अश्रू अनावर

(Minister of State Bachchu Kadu in Nashik Court in former Municipal Commissioner Abhishek Krishna Ruckus Case)