AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जितेंद्र भावेंच्या अडचणी वाढल्या, नाशिकमध्ये सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, नेमकं कारण काय?

नाशिकमधील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे यांच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. Jitendra Bhave Vision Hospital

जितेंद्र भावेंच्या अडचणी वाढल्या, नाशिकमध्ये सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, नेमकं कारण काय?
जितेंद्र भावे, सामाजिक कार्यकर्ते
| Updated on: May 27, 2021 | 1:46 PM
Share

नाशिक: सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे यांच्यावर नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  जितेंद्र भावे यांच्यावर मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाशिक मधील कॉलेज रोड परिसरात स्थित व्हिजन हॉस्पिटल मध्ये रुग्णांचे राहिलेले ( थकीत ) बिल न अदा करता निघून गेले म्हणून भावेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Sarkarwada Police station booked case against Jitendra Bhave on complaint of Vision Hospital)

जितेंद्र भावेंवर कोणत्या कारणांमुळे गुन्हा दाखल

कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने रुग्णालय प्रशासनासोबत धमकून नित्य कामात अडथळा म्हणून वैद्यकीय सेवा संस्था हिंसक कृत्य मालमत्तेची हानी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय भावेंवर साथरोग सुधारणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

मुंबई नाका पोलिसांतही गुन्हा दाखल

बुधवारी नाशिकच्या मुंबई नाका पोलीस स्थानकात जितेंद्र भावे व त्यांच्या समर्थकांवर गर्दी जमविल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. दोन दिवसापूर्वीच नाशिकच्या नामांकित वोकार्ड हॉस्पिटलमध्ये जितेंद्र भावे यांनी कपडे काढून अर्धनग्न आंदोलन केले होते. यानंतर जितेंद्र भावे चर्चेत आले होते. नाशिकच्या एका नामांकित हॉस्पिटलने कोरोनाबाधित रुग्णांकडून अवाजवी बिल आकारल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे (Jitendra Bhave) यांनी करत अर्धनग्न आंदोलन केलं होतं. या आंदोलनानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं होते. रुग्णालयातील आंदोलन प्रकरणी जितेंद्र भावे आणि समर्थकांवर मुंबई नाका पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केल्या प्रकरणी जितेंद्र भावे आणि समर्थकांव र गुन्हा दाखल करण्यात आला होता. जितेंद्र भावे यांच्यावर कलम 188 आणि बेकायदेशीर रित्या गर्दी जमवणे अशा कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र भावे यांनी मंगळवारी नाशिकमधील नामांकित रुग्णालयात हॉस्पिटलच्या बिलाच्या मुद्यावरुन आंदोलन केलं होतं.

नाशिक शहरातील वेगवेगळ्या रुग्णालय मध्ये जाऊन अवाजवी बिलाविरुद्ध भावे सोशल मीडियावर लाईव्ह व्हिडिओ करून जितेंद्र भावे रुग्णालय प्रशासनाला जाब विचारत असतात. सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे आम आदमी पक्षाशी संबंधित आहेत. विजन हॉस्पिटलचे डॉक्टर विक्रांत विनोद व्हिजन यांनी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

संबंधित बातम्या:

नाशिकच्या रुग्णालयातील अर्धनग्न आंदोलन, जितेंद्र भावेंविरोधात गुन्हा दाखल

नाशिकच्या वोकहार्ट हॉस्पिटलची चौकशी होणार, वेळ पडल्यास मान्यताही रद्द करु- महापौर

(Nashik Sarkarwada Police station booked case against Jitendra Bhave on complaint of Vision Hospital)

अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा
अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा.
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून....
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून.....
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण.
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका.
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा.
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना....
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना.....
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले...
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले....
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर...
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर....
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले.