.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विम्याचे पैसे लाटण्यासाठी अपघाताचा कट रचला, पैशासाठी साथीदारांनी त्याचाच काटा काढत कोट्यवधी रुपये लाटले

एका संशयिताला पैसे कमी आल्याने या टोळीत वाद झाला. त्यामुळे त्याने मयत अशोक रमेश भालेराव याच्या भावाला हा अपघात नसून घातपात असल्याची कल्पना दिली. त्यांनतर मयताच्या भावाने पोलिसांना तपासाबाबत पत्र दिले.

विम्याचे पैसे लाटण्यासाठी अपघाताचा कट रचला, पैशासाठी साथीदारांनी त्याचाच काटा काढत कोट्यवधी रुपये लाटले
हत्या करुन अपघाताचा बनाव करत विम्याचे पैसे लाटलेImage Credit source: TV9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Dec 14, 2022 | 5:33 PM
Share

नाशिक / चैतन्य गायकवाड (प्रतिनिधी) : स्वतःच्या विम्याचे पैसे लाटण्यासाठी स्वतःच्याच अपघाताचा बनाव रचून पैसे लाटण्याचा डाव स्वतःच्याच जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. एका संशयित आरोपीला ठरलेल्या रकमेपैकी पैसे कमी दिले गेल्याने त्याने हा संपूर्ण घातपाताचा बनाव मयताच्या भावाला सांगितल्याने हा डाव उघड झाला. याप्रकरणी नाशिकच्या मुंबई नाका पोलिसांनी सहा संशयितांना अटक केली आहे. संशयित 6 आरोपींनी विम्याचे 4 कोटी 10 लाख रुपये लाटले.

सप्टेंबर 2021 मध्ये केली होती हत्या

सप्टेंबर 2021 मध्ये एका व्यक्तीचा खून करून अपघात झाल्याचा बनाव रचला. त्यानंतर सहा संशयितांनी मयत व्यक्तीच्या विम्याचे तब्बल चार कोटी रुपये दुसऱ्याच महिलेला त्याची पत्नी म्हणून बोगस वारस दाखवत विमा क्लेम केला. या गुन्ह्यात एका महिलेसह पाच संशयितांना रात्री उशिरा मुंबईनाका पोलिसांनी अटक केली आहे.

मयताचाही कटात होता सहभाग

मुख्य संशयित मंगेश बाबूराव सावकार, रजनी प्रणव उके, प्रणव साळवी यांच्यासह आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. संशयित बाबूराव सावकार याच्या दुचाकीच्या डिक्कीतून पिस्टल आणि 6 काडतूस पोलिसांनी जप्त केली आहेत. विशेष बाब म्हणजे मयत झालेला अशोक भालेराव हा देखील ह्या कटात सामील असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय.

प्लान फसत चालल्याने भालेरावचाच काटा काढत पैसे लाटले

विमा कंपन्यांकडून 10 वेगवेगळ्या पॉलिसी या भालेरावने 2019 पासून संशयितांसह सुरू केल्या होत्या. मात्र हा प्लॅन फसत असल्या कारणामुळे संशयितांनी मयत भालेरावचाच काटा काढला आणि अपघाताचा बनाव करून चार कोटी दहा लाख रुपये संशयित बोगस पत्नीच्या अकाउंटवर जमा करुन घेतले. त्यानंतर या संशयितांनी हे पैसे आपसात वाटून घेतले.

एका आरोपीला पैसे कमी गेल्याने बनाव उघड

मात्र एका संशयिताला पैसे कमी आल्याने या टोळीत वाद झाला. त्यामुळे त्याने मयत अशोक रमेश भालेराव याच्या भावाला हा अपघात नसून घातपात असल्याची कल्पना दिली. त्यांनतर मयताच्या भावाने पोलिसांना तपासाबाबत पत्र दिले.

पोलिसांनी संशयित आरोपी महिला रजनी उके हिला ताब्यात घेत चौकशी केली असता सर्व प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तिने इतर सहकाऱ्यांची देखील नावे सांगितली.

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर