AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कारची काच फोडून अडीच लाखांची लूट; नाशिकमधली भर दुपारची घटना

शहराच्या वर्दळीच्या ठिकाणी उभ्या केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी अडीच लाख रुपये असलेली बॅग लुटली. नाशिकमध्ये (Nashik) घडलेल्या या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

कारची काच फोडून अडीच लाखांची लूट; नाशिकमधली भर दुपारची घटना
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Sep 20, 2021 | 5:15 PM
Share

नाशिकः शहराच्या वर्दळीच्या ठिकाणी उभ्या केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी अडीच लाख रुपये असलेली बॅग लुटली. नाशिकमध्ये (Nashik) घडलेल्या या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Theft of Rs 2.5 lakh by breaking car glass; Afternoon incident in Nashik)

गेल्या काही दिवसांपासून नाशिक खून आणि चोरीच्या घटनांनी हादरून गेले आहे. नागरिकांना सायंकाळनंतर घराबाहेर पडायचे म्हणजे अंगावर काटा येतो. त्यातच भर दुपारी हा प्रकार घडल्याने त्यात भर पडली आहे. जयराम नेवदराम दियालानी (रा. टागोनगर) यांनी शनिवारी दुपारी आपली कार (एम. एच.15 ईआर 3133) शालिमार भागातील सांगली बँक सिग्नल परिसरातील जगन्नाथ रेस्टॉरंटसमोर उभी केली होती. तेव्हा चोरट्याने या कारची काच फोडली. चालकाच्या सीटवर असलेली बॅग लंपास केली. या बॅगेमध्ये अडीच लाखांची रक्कम आणि महत्त्वाची कागपदत्रे होती. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक खांडवी हे करत आहेत.

बनावट नोटांचा छापखाना उघड

कलर प्रिंटिंगचा व्यवसाय बंद असल्याने चक्क बनावट नोटांचा छापखाना सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिक पोलिसांनी हा छापखाना उद्ध्वस्त केला असून, या प्रकरणात एकूण सात जणांना अटक केली आहे. नाशिकमधील सुरगाणा तालुक्यातील हा धक्कादायक प्रकार आहे. या छापखान्याचे धागेदोरे लासलगाव जवळील विंचूरपर्यंत असल्याचेही पोलिसांना समजले आहे. अटक केलेल्या आरोपींनी या छापखान्याच्या माध्यमातून आतापर्यंत लाखो बनावट नोटा छापल्या आहेत.

गुन्ह्यांमध्ये झाली वाढ

दरम्यान, गेल्या दिवसांमध्ये नाशिकमध्ये खून, चोरी, लूटमार असे गुन्हे वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक सायंकाळच्या वेळी एकटे घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर पोलिसांचा वचक राहिला नाही, पोलीस हेल्मेट सक्तीमध्ये व्यस्त असल्याचा आरोप नाशिककरांकडून केला जात आहे. (Theft of Rs 2.5 lakh by breaking car glass; Afternoon incident in Nashik)

इतर बातम्याः

धक्कादायकः दोस्ताची थट्टा दोस्ताच्या जीवावर…ढकलेला मित्र जागेवर गतप्राण…नाशिकमधली चटका लावणारी घटना

नाशिकमध्ये बाप्पांच्या विसर्जनाला गालबोट; मूर्ती संकलन करणाऱ्या ट्रकच्या धडकेत एक ठार

अमेरिकेतील पतीकडून पत्नीवर हुंड्यासाठी अमानवीय अत्याचार; मित्रांना पाठवले अश्लील मेसेज, नाशिकमध्ये गुन्हा दाखल

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.