जैसे ज्याचे कर्म तैसे.., चोरीसाठी दोन साथीदारांना घेऊन इमारतीवर चढला, चौथ्या मजल्यावर तोल गेला आणि….

| Updated on: Sep 20, 2021 | 5:16 PM

चोरीच्या उद्देशाने आलेल्या एका चोराला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना शहरातील द्वारका भागातील कन्नमवार पुलाजवळ घडली आहे.

जैसे ज्याचे कर्म तैसे.., चोरीसाठी दोन साथीदारांना घेऊन इमारतीवर चढला, चौथ्या मजल्यावर तोल गेला आणि....
घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतरचे दृश्य
Follow us on

नाशिक : जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, असं बोललं जातं. अगदी तशीच काहिशी घटना नाशिक शहरातून समोर आली आहे. एक चोर आपल्या काही साथीदारांना घेऊन एका इमारतीत शिरला. तिथे तो चोरी करु लागला. चौथ्या मजल्यावरुन चोरीचा मुद्देमाल खाली फेकत असताना त्याचा देखील तोल गेला आणि तो थेट खाली कोसळला. यामध्ये तो प्रचंड जखमी झाला. विशेष म्हणजे त्याच्यासोबत चोरीला साथ देणाऱ्या त्याच्या सहकाऱ्यांनी देखील शेवटच्या समयी त्याची साथ सोडली. त्यांनी त्याचा मृतदेहही तिथेच सोडला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडल?

चोरीच्या उद्देशाने आलेल्या एका चोराला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना शहरातील द्वारका भागातील कन्नमवार पुलाजवळ घडली आहे. कन्नमवार पुलालगत एका इमारतीचे काम सुरु आहे. या इमारतीत चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या चार जणांपैकी पैकी एका जणाचा इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

गज खाली फेकत असताना चोराचा तोल गेला

मूळचा नंदुरबार येथील राहणारा चंदू शामा असं या घटनेत मृत्यू झालेल्या 30 वर्षीय इसमाचे नाव आहे. स्टार लाईन या इमारतीत चोरीछुपे पद्धतीने प्रवेश करुन मयत चंदू शामा याच्यासह त्याचे अल्पवयीन दोन साथीदार गेल्या अनेक दिवसांपासून गज चोरत असल्याची माहिती समोर आली आहे. या दरम्यान काल (19 सप्टेंबर) मध्यरात्रीच्या सुमारास चंदू शामा हा चौथ्या मजल्यावरुन चोरी करत असताना स्टार लाईन कॉम्प्लेक्स या इमारतीतील पडलेले गज खाली फेकत असताना अचानक त्याचा तोल जाऊन तो खाली पडला. त्यात त्याचा मृत्यू झाला.

पोलीस घटनास्थळी दाखल

मृतक चंदू शामा इमारतीतून खाली पडल्यानंतर जखमी झाला होता. पण त्याचे हृदयाचे ठोके सुरु होते. तो जिवंत होता. त्याचे साथीदार त्याला उपचारासाठी चोरीछुपे मार्गानेच घेऊन जात होते. मात्र, त्यांनी त्याला वाटेतच सोडून देत घटनास्थळावरुन पळ काढला. स्थानिक नागरिकांनी जेव्हा मृतदेह बघितला तेव्हा परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणाची तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस तातडीने दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

पोलिसांनी आरोपीला कसं पकडलं?

प्रथमदर्शनी हा खुनाचा प्रकार असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवली होता. मात्र मृतदेहाजवळ आढळून आलेल्या प्रत्यक्ष बाबींवरुन त्याच्या बोटाला सीमेंटसारखं काहितरी लागल्याचं आढळलं. त्यामुळे हा बांधकाम मजूर असल्याचा संशय पोलिसांना आला. या घटनेचा अधिक तपास करताना तो मागील इमारतीवरुनच पडल्याचा पुरावा पोलिसांना मिळाला. पोलिसांनी सूत्रे फिरवून त्याच्या इतर दोन साथीदारांना ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केली असता तो चोरीच्या उद्देशाने इमारतीच्या चौथ्या मजल्यावर गेला होता. तिथेच तो त्याचा तोल गेला आणि तो खाली पडल्याची माहिती त्याच्या सहकाऱ्यांनी दिली. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी मृतकाच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.

हेही वाचा :

धक्कादायकः दोस्ताची थट्टा दोस्ताच्या जीवावर…ढकलेला मित्र जागेवर गतप्राण…नाशिकमधली चटका लावणारी घटना

नवरा लैंगिकदृष्ट्या सक्षम नाही, सासरच्यांचा सूनेला मूल होण्यासाठी कोंबडीचं रक्त पाजून अघोरी प्रयोग, सासऱ्याकडून विनयभंग