नवरा लैंगिकदृष्ट्या सक्षम नाही, सासरच्यांचा सूनेला मूल होण्यासाठी कोंबडीचं रक्त पाजून अघोरी प्रयोग, सासऱ्याकडून विनयभंग

एका महिलेला तिच्या सासरच्यांनी प्रचंड छळलं. तिला माहेरच्यांकडून पैसे आणण्यासाठी छळलं. तसेच मूल होण्यासाठी कोंबडीचं रक्त पाजत अघोरी प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर मूल होत नाही म्हणून सासऱ्याने सूनेचा विनयभंग केल्याचाही संतापजन प्रकार उघडकीस आला आहे.

नवरा लैंगिकदृष्ट्या सक्षम नाही, सासरच्यांचा सूनेला मूल होण्यासाठी कोंबडीचं रक्त पाजून अघोरी प्रयोग, सासऱ्याकडून विनयभंग
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Sep 20, 2021 | 4:09 PM

पिंपरी चिंचवड (पुणे) : महाराष्ट्राची पुरोगामी अशी ख्याती आहे. पण या पुरोगामी महाराष्ट्रात आजही जादूटोणा सारख्या घटना घडतात ही लाजिरवाणी आणि खेदाची बाब आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरात एक घटना समोर आली आहे. या घटनेने तर सर्व सीमा पार केल्या आहेत. एका महिलेला तिच्या सासरच्यांनी प्रचंड छळलं. तिला माहेरच्यांकडून पैसे आणण्यासाठी छळलं. तसेच मूल होण्यासाठी कोंबडीचं रक्त पाजत अघोरी प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर मूल होत नाही म्हणून सासऱ्याने सूनेचा विनयभंग केल्याचाही संतापजन प्रकार उघडकीस आला आहे. पिंपरी चिंचवड सारख्या या शहरात अशा प्रकारची घटना घडत असेल तर हे वाईट आहे, अशा शब्दात पोलिसांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

पीडित महिलेचं तीन वर्षांपूर्वी आरोपी पती अमित वाघुले (वय 33) याच्याशी लग्न झालं होतं. अमित याने आपण इंजिनिअर असल्याचं सांगत हे लग्न केलं होतं. पण पीडित महिलेने संबंधित माहिती ही खोटी असल्याचं फिर्यादित म्हटलं आहे. आरोपी आणि तिच्या कुटुंबियांनी मुलगा इंजिनिअर असल्याची खोटी माहिती देवून लग्न केलं, असा आरोप पीडितेने केला आहे. तसेच लग्नानंतर गेल्या तीन वर्षांपासून पीडितेचा सासरच्यांकडून छळ सुरु होता. या छळाला कंटाळून अखेर पीडितेने रविवारी (19 सप्टेंबर) रात्री पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिथे पीडितेने आरोपींविरोधात तक्रार केली.

पीडितेच्या सासरच्यांवर गुन्हा दाखल

पीडितेने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पीडितेचा पती अमित वाघूले, सासरा सुदाम वाघूले (वय 63), सासू संध्या वाघूल (वय 53) यांच्या विरोधात हुंड्यासाठी छळ, त्यासाठी मारहाण, जीवे मारण्याची धमकी देणे, विनयभंग आणि अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक केलेली नाही. पोलिसांचा तपास सुरु आहे. पोलीस या प्रकरणात खेडच्या कनेरसर येथील बुवाचा देखील या प्रकरणात हस्तक्षेप आढळल्यास त्याच्यावरही कारवाई करण्याची शक्यता आहे.

सासऱ्याकडून विनयभंग

आरोपी महिलेला घरखर्चासाठी आणि रत्नागिरीत घर बांधण्यासाठी माहेराहून पैसे आण, असा तगादा लावत होते. तसेच पीडितेच्या सासऱ्याने तिला जवळ ओढून विनयभंग केला. नवरा हा लैंगिक सक्षम नाही. त्यामुळे त्याच्यावर औषधोपचार सुरु होता. पण नवऱ्याच्या औषधोपचारावर पैसे खर्च करण्यापेक्षा मी तुला मूल देतो, असं म्हणत सासऱ्याने पीडितेशी शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने तरीही हे सगळं सहन केलं. तसेच पीडितेने आपला नवरा लैंगिकदृष्ट्या सक्षम नाही ही बाब आपल्या आई-वडिलांना सांगितल्यानंतर तिच्या माहेरच्यांनी तिला आणखी छळण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडून होणारा छळ असह्य झाल्याने अखेर पीडितेने भोसरी पोलीस ठाणे गाठीत सगाळा प्रकार सांगितला.

हेही वाचा :

चेन्नईतून बालकाचं अपहरण, ट्रेन नागपूरला पोहोचली, रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरुप सुटका

परपुरुषांसोबत चॅटिंग करत असल्याचा संशय, 23 वर्षीय विवाहितेची पतीकडून गळा दाबून हत्या

Non Stop LIVE Update
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.