परपुरुषांसोबत चॅटिंग करत असल्याचा संशय, 23 वर्षीय विवाहितेची पतीकडून गळा दाबून हत्या

हुगळी जिल्ह्यातील चंदननगर पोलीस स्टेशन परिसरात पती रिंटू दासने पत्नी पल्लवी दासचा (23 वर्ष) गळा दाबून खून केला. याचं कारण म्हणजे पत्नी सतत फेसबुक चॅटिंगमध्ये बिझी असायची. आरोपी पती रिंटू दासला संशय होता, की त्याची पत्नी पल्लवी फेसबुक चॅटद्वारे इतर पुरुषांशी मैत्री करत आहे.

परपुरुषांसोबत चॅटिंग करत असल्याचा संशय, 23 वर्षीय विवाहितेची पतीकडून गळा दाबून हत्या
मयत विवाहिता
Follow us
| Updated on: Sep 20, 2021 | 3:43 PM

कोलकाता : पश्चिम बंगालमधील एका जोडप्यामध्ये फेसबुक चॅटिंगवरुन झालेला वाद इतका वाढला, की पतीने आपल्या पत्नीचा जीव घेतला. पतीला संशय होता की पत्नी चॅटिंगद्वारे इतर पुरुषांशी मैत्री करत आहे. यामुळे त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला. अखेर वाद इतका विकोपाला गेला, की रविवारी पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. ही खळबळजनक घटना पश्चिम बंगालमधील हुगली जिल्ह्यातील आहे.

नेमकं काय घडलं?

हुगळी जिल्ह्यातील चंदननगर पोलीस स्टेशन परिसरात पती रिंटू दासने पत्नी पल्लवी दासचा (23 वर्ष) गळा दाबून खून केला. याचं कारण म्हणजे पत्नी सतत फेसबुक चॅटिंगमध्ये बिझी असायची. आरोपी पती रिंटू दासला संशय होता, की त्याची पत्नी पल्लवी फेसबुक चॅटद्वारे इतर पुरुषांशी मैत्री करत आहे. यामुळे त्याला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर शंका होती.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी श्रीरामपूर गिरवळ येथून रुग्णालयात पाठवला.

भाऊ संशयी, वहिनीला मारहाण

आरोपी रिंटू दासचा भाऊ सिंटू दास याने सांगितले की वहिनी चांगल्या स्वभावाची होती पण आपला भाऊ नेहमी तिच्यावर संशय घ्यायचा आणि नेहमी तिला मारहाण करायचा.

पोलीस तपास सुरु

आरोपीची आई माना दास यांनी सांगितले की तिची सून पल्लवी दासला फेसबुक चॅटिंगची आवड होती, त्यामुळे पती-पत्नीमध्ये नेहमी भांडणे होत असत. या हत्येविषयी माहिती देताना चंदननगर आयुक्तालयाचे डीसीपी मुख्यालय प्रवीण प्रकाश म्हणाले की, आरोपी पती रिंटू दासला पोलिसांनी भादंविच्या कलम 302 आणि 498 ए अंतर्गत अटक केली आहे. या प्रकरणी पुढील कारवाई केली जात आहे.

वहिनीची चाकूने वार करुन हत्या

दुसरीकडे, उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये वहिनीची चाकूने वार करुन हत्या केल्याच्या आरोपाखाली दीराला अटक करण्यात आली आहे. मुरादाबाद शहर पोलीस अधीक्षक अमित कुमार आनंद यांनी याविषयी माहिती दिली. कटघर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी इम्रानची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

काय आहे प्रकरण?

शनिवारी संध्याकाळी इम्रानने त्याची वहिनी प्रवीणची चाकूने भोसकून हत्या केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशी सुरू आहे, असं पोलीस अधीक्षक अमित कुमार आनंद यांनी सांगितलं. मृत विवाहिता प्रवीणचे पती परवेज यांनी सांगितले की, जेव्हा ही घटना घडली तेव्हा कुटुंबातील सदस्य तळ मजल्यावर नमाज पठण करत होते. तर त्यांची पत्नी प्रवीण पहिल्या मजल्यावर होती. 37 वर्षीय महिला चार मुलांची आई होती.

संबंधित बातम्या :

वहिनीची चाकूने भोसकून हत्या, दीराला अटक

दिरासोबत राहण्यासाठी आधी पतीची हत्या, आता वहिनीने त्याच दिराचाही जीव घेतला

वहिनीला ‘मधलं बोट’ दाखवलं, दीराला तीन वर्षांचा कारावास

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.