AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik Crime|बाप नव्हे, माणुसकीला डसलेला साप; पोटच्या गोळ्याला जंगलात फाशी देण्याचा प्रयत्न!

पोलिसांनी संशयित पित्याला बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, या कृत्याने माणूस म्हणून आपण आणखी किती खाली जावू शकते, हेच समोर आल्याचे प्रतीत होत आहे.

Nashik Crime|बाप नव्हे, माणुसकीला डसलेला साप; पोटच्या गोळ्याला जंगलात फाशी देण्याचा प्रयत्न!
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Jan 08, 2022 | 4:48 PM
Share

नाशिकः माणुसकीला काळीमा फासणारी घटना नाशिक जिल्ह्यात उघड झाली आहे. चक्क जन्मदात्या बापाने पोटच्या दहा वर्षांच्या मुलीला फाशी देण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाल्याने एकच खळबळ माजली आहे. पोलिसांनी संशयित पित्याला बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, या कृत्याने माणूस म्हणून आपण आणखी किती खाली जावू शकते, हेच समोर आल्याचे प्रतीत होत आहे.

नेमका काय प्रकार?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकमधील दिंडोरी तालुक्यातल्या देहरेवाडी जंगलात शुक्रवारी, 7 जानेवारी रोजी दुपारी बाराच्या सुमारास ही अतिशय भयंकर घटना घडली. देहरेवाडी परिसरातील अनेक गुरे जंगलात चरण्यासाठी आणली जातात. कालही देहरेवाडी येथील गुराखी नारायण गांगुर्डे आपली गुरे घेऊन जंगलात आले होते. मात्र, त्यांच्या कानावर कसला तरी आवाज पडला. त्यांची उत्सुकता चाळवली. त्यांनी त्या आवाजाच्या दिशेने प्रवास सुरू केला. त्यांना अगोदर जंगलातील हिंस्त्र प्राणी, जनावरे असतील असे वाटले. त्यामुळे त्यांची भीती वाढली होती. कारण या जंगलात नेहमीच हिंस्त्र प्राण्याचा वावर असतो. गांगुर्डे यांची अगोदरच नुसत्या कल्पनेने घाबरगुंडी उडाली होती. शेवटी त्यांनी धाडसाने आवाजाच्या दिशेने जात पाहिले, तर समोरचे दृश्य धडकी भरवणारे होते.

फासावर लटकवण्याचा प्रयत्न

एक व्यक्ती एका लहान मुलीला फासावर लटकवत होता. हे पाहता गांगुर्डे यांनी जोरदार आरडाओरडा सुरू केला. आणि तितक्याच वेगाने त्या व्यक्तीच्या दिशेने धाव घेतली. हे पाहून समोरच्या व्यक्तीने मुलीला फास देणारा दोर सोडून जंगलात पोबारा केला. गांगुर्डे यांनी मुलीच्या गळ्याचा फास काढला. तिला गावात आणले आणि घटनेचे माहिती पोलीस पाटील साहेब साळवे यांना दिली. त्यांनी तातडीने पोलिसांना कळवले. या मुलीवर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते. पोलिसांना रात्री उशिरा या मुलीची ओळख पटवण्यात यश आले. ही मुलगी मुंगसरा या गावातली आहे. ती सध्या चौथ्या वर्गात शिकते. मात्र, हे कृत्य कोणी आणि का केले याचा शोध घ्यायला पोलिसांनी सुरुवात केली. हा नरबळीचा वगैरे तरी प्रकार नसावा ना, अशी भीतीही अनेकांनी व्यक्त केली. मात्र, यातले सत्य अखेर समोर आले आहे.

का केले कृत्य?

मुलीला तिच्या वडिलांनीच फासावर देण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाने असे धक्कादायक वळण घेतल्याचे पाहून पोलीस सुद्धा हादरले आहेत. बापाला मुलगी नकोशी झाली होती. त्यामुळे त्याने तिला जंगलात नेऊन संपवायचा घाट घातला. तिला फाशी देऊन संपवण्याचा त्याचा डाव होता, असे पोलीस तपासात समोर आले आहे. या नराधम बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

इतर बातम्याः

Nashik| सामाजिक कार्यकर्त्या, महिला हक्क संरक्षण समितीच्या माजी अध्यक्ष साधना तोरणे यांचे निधन

Video| पुन्हा अवकाळी तडाखा, शेतकऱ्यांना हुंदके अनावर; उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भाला इशारा

Nashik Corona|धोका वाढला, नाशिकमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अडीच हजारांच्याही पुढे!

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.