Nashik Crime : IVF सेंटरमध्ये एग स्मगलिंक रॅकेट, बायकोच्या नावे गोरखधंदा, डेंटिस्टच्या आवळल्या मुसक्या

ठाणे पोलिसांकडून महिलांच्या अंडी तस्करीच्या आंतरराज्यीय रॅकेटमधील नाशिकमधील एका डेंटिस्टला अटक करण्यात आली आहे. डॉ. अमोल पाटील यांनी आपल्या पत्नीच्या नावावरील 'मालती आयव्हीएफ सेंटर'चा वापर बेकायदेशीर सरोगसी आणि अंडी तस्करीसाठी केल्याचा आरोप आहे. गरजू महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांचे शोषण करत, बनावट कागदपत्रांच्या आधारे अनेकदा अंडी दान करण्यास भाग पाडले गेले. या प्रकरणात 500 हून अधिक महिलांचे शोषण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Nashik Crime : IVF सेंटरमध्ये एग स्मगलिंक रॅकेट, बायकोच्या नावे गोरखधंदा, डेंटिस्टच्या आवळल्या मुसक्या
Image Credit source: Getty Images
| Updated on: Mar 05, 2026 | 11:37 AM

ठाणे जिल्ह्यातून महिलांच्या एग स्मगलिंगच्याआंतरराज्यीय रॅकेटमधील आणखी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी नाशिकमधील एका डेंटिस्टला ताब्यात घेण्यात आलं आहे. या डॉक्टरने, त्याच्या पत्नीच्या नावावर नोंदणीकृत आयव्हीएफ सेंटरचा वापर बेकायदेशीर कामांसाठी केला, असा आरोप त्याच्यावर आहे. यामुळे राज्यात मोठी खळबळ माजली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसा, डॉ. अमोल पाटील असं आरोपीचं नाव असून तो नाशिकच्या मुंबई नाका परिसरात ‘मालती आयव्हीएफ सेंटर’ चालवत होता. मात्र हे आयव्हीएफ सेंटर हे अधिकृतरित्या त्याच्या पत्नीच्या नावावर असून तिच्याच नावे रजिस्ट्रेशन आहे, मात्र अवैधरित्या सरोगसी कॉन्ट्रॅक्ट आणि महिलांच्या एगची तस्करी करण्यासाठी याचा (सेंटरचा) वापर केला जायचा अशी खळबळजनकत माहिती तपासात उघड झाली आहे.

6 जणांना अटक

एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा डॉ. पाटील याला अटक केली. बुधवारी त्याला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले असता, कोर्टाने त्याला 9 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या अटकेमुळे आता प्रकरणात पोलिस कोठडीत असलेल्या आरोपींची संख्या सहा झाली आहे. यापूर्वी सुलक्षणा गाडेकर, अश्विनी चाबुकस्वार, मंजुषा वानखेडे, सोनल गरेवाल आणि सुमित सोनकांबळे यांना अटक करण्यात आली होती.

पैशांचं दाखवलं आमिष

ही टोळी गरजू महिलांना पैशाचे आमिष दाखवून अनेक वेळा अंडी दान करायला लावायची, असं पोलिस तपासात समोर आलं. यासाठी बनावट आधार कार्ड आणि बनावट ओळखपत्रे तयार करण्यात आली. एकाच महिलेला वेगवेगळ्या नावांनी अनेक वेळा डोनर म्हणून दाखवता येईल आणि कायदेशीर नियमांना बगल देता येईल यासाठी हा सर्व जुगाड करण्यात आला होता.

500 हून अधिक महिलांचे शोषण

या छाप्यादरम्यान अंदाजे 15 लाख किमतीची औषधे आणि इंजेक्शन्स जप्त करण्यात आली, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. एवढंच नव्हे तर या नेटवर्कद्वारे 500 हून अधिक महिलांचे शोषण झाले असावे अशी माहितीही प्राथमिक तपासात समोर आली आहे. एकदा एग्ज डोनेट करण्यासाठी महिलांना फक्त 25,000 ते 30,000पये दिले जात होते, मात्र पुढे जाऊन हीच अंडी लाखो रुपयांना विकली जायची.

या प्रकरणातील सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांची तीन पथकं सतत छापेमारी करत आहे, असं उल्हासनगरचे डीसीपी सचिन गोरे म्हणाले. अटक केलेल्या आरोपींच्या मोबाईल फोनमधून अनेक महिलांचे फोटो, बनावट प्रतिज्ञापत्रे आणि सोनोग्राफी रिपोर्ट देखील जप्त करण्यात आले आहेत. या बेकायदेशीर व्यवसायात गुंतलेल्या मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी पोलीसांकडून आता, ठाणे आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये असलेल्या इतर आयव्हीएफ आणि सोनोग्राफी केंद्रांचाही तपास करण्यात येत आहे.

 

Follow Us