AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तारीख ठरली… तब्बल 16 महिन्यांनी मोदी-ट्रम्प एकमेकांना भेटणार, महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार

Modi Trump Meeting : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे फ्रान्समध्ये एकमेकांना भेटणार आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चाही होणार आहे.

तारीख ठरली... तब्बल 16 महिन्यांनी मोदी-ट्रम्प एकमेकांना भेटणार, महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार
Modi Trump MeetingImage Credit source: Google
| Updated on: Jun 13, 2026 | 10:54 PM
Share

भारत आणि अमेरिका यांच्यातील सबंध तितकेसे ठीक नाहीत, अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 17 जून रोजी फ्रान्समध्ये एकमेकांना भेटणार आहेत. एका वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, जी-7 परिषदेसाठी फ्रान्समध्ये दाखल होणारे हे दोन्ही जागतिक नेते द्विपक्षीय चर्चाही करणार आहेत. दोन्ही नेत्यांची ही बैठक अशा वेळी होत आहे जेव्हा अलीकडेच अमेरिकन नौदलाच्या कारवाईत तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाल्याची घटना चर्चेत आहे.

16 महिन्यांनंतर मोदी-ट्रम्प आमनेसामने

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची शेवटची भेट 13 फेब्रुवारी 2025 रोजी झाली होती. आता तब्बल 16 महिन्यांनंतर दोन्ही नेते पुन्हा एकदा समोरासमोर येणार आहेत. मागील भेटीनंतर ऑपरेशन सिंदूर, भारतावर अमेरिकेने लावलेले शुल्क (टॅरिफ), तसेच भारत-अमेरिका व्यापार करारासंदर्भातील विविध घडामोडी घडल्या आहेत. काही वृत्तांमध्ये असाही दावा करण्यात आला होता की, कॅनडामधील जी-7 परिषदेदरम्यान ट्रम्प यांनी मोदींना अमेरिकेला भेट देण्याचे निमंत्रण दिले होते, मात्र मोदींनी ते नाकारले होते.

द्विपक्षीय चर्चेत अनेक महत्त्वाचे मुद्दे

पंतप्रधान मोदी 16 आणि 17 जून रोजी फ्रान्समधील एव्हियन येथे होणाऱ्या जी-7 परिषदेत सहभागी होणार आहेत. याच दरम्यान त्यांची ट्रम्प यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक होणार आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात सध्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. त्यामुळे या बैठकीत व्यापार करार, संरक्षण सहकार्य, ऊर्जा क्षेत्रातील भागीदारी आणि भारतीय नागरिकांसाठी व्हिसा धोरण यांसारख्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

भारतीय जहाजांवरील हल्ल्याचा मुद्दा

मोदी-ट्रम्प भेटीला आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे कारण अलीकडेच अमेरिकन नौदलाच्या कारवाईत तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी भारत सरकारने अमेरिकन राजनैतिक अधिकाऱ्याला बोलावून तीव्र निषेध नोंदवला होता. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये दावा केला होता की, इराणने ड्रोनद्वारे अमेरिकन जहाजांवर हल्ल्याचा प्रयत्न केला होता, जो अमेरिकन नौदलाने हाणून पाडला. मात्र या घटनेबाबत अमेरिका, इराण किंवा भारत या तिन्ही देशांकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.

मोदी इतरही नेत्यांची भेट घेणार

डोनाल्ड ट्रम्प यांच्याव्यतिरिक्त पंतप्रधान मोदी जी-7 समूहातील इतर देशांच्या नेत्यांचीही भेट घेणार आहेत. त्यामध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबतची बैठक विशेष महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीत राफेल लढाऊ विमानांबाबत मोठ्या करारावर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे. तसेच फ्रान्स ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत मल्टी-रोल फायटर एअरक्राफ्ट प्रकल्प भारतात विकसित करण्यास सहमती दर्शवू शकतो असेही बोलले जात आहे.

Follow Us
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा
'मुंबईतील शाळा तपासणी अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरण्याचे आदेश'
आशिष शेलार यांचे मुंबईतील शाळा तपासणी अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरण्याचे आदेश