Malegaon Accident : मालेगावात टेम्पोचा भीषण अपघात, 4 जण जागीच ठार तर 15 जखमी, घटना कशी घडली?

| Updated on: Mar 06, 2022 | 8:50 PM

मालेगावात टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 4 जण जागीच ठार झाल्याची माहिती मिळतेय. तर 15 जण जखमी झाले असून 4 जणांची प्रकृती गंभीर आहे.

Malegaon Accident : मालेगावात टेम्पोचा भीषण अपघात, 4 जण जागीच ठार तर 15 जखमी, घटना कशी घडली?
पिक अप पलटी झाल्यानं 5 जणांचा जागीच मृत्यू झालाय
Image Credit source: Tv9 Marathi
Follow us on

नाशिक: चाळीसगावहून (Chalisgaon) मालेगांवच्या (Malegaon) चांदनपुरीच्या खंडेराव महाराज यांच्या दर्शनासाठी तसेच त्यासाठी मोठ्या प्रमाणावर बाहेरून गोंधळ करण्यासाठी येत असतात. हा कार्यक्रम आटोपून चंदनपुरीहून वापस निघाले तेव्हा चाळीसगाव गाव रोडवरील गिगाव फाट्यावर हा अपघात (Accident) झाला. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, 15 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. टेम्पोला मागून धडक दिल्यानं तो पलटी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीनं जखमींना बाहेर काढण्यात आलं असून त्यांना मालेगाव जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींपैकी 4 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

कुठं घटना घडली?

मालेगांव चाळीसगाव रोडवर भीषण अपघात झाला. मालेगांवच्या गिगाव फाट्यावर ही घटना घडली. भाविकांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला अज्ञात वाहनानं मागच्या बाजूनं धडक दिल्यानं हा अपघात झाल्याची माहिती मिळतेय. अपघाताच्या ठिकाणी चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर तर 15 पेक्षा जास्त लोकं जखमी झाले आहेत. सर्व अपघातग्रस्त हे चाळीसगाव तालुक्यातील असून चंदनपुरी येथे खंडोबाच्या दर्शनासाठी आले होते. दर्शनानंतर परत जाताना अपघात झाल्याची माहिती आहे. अपघातग्रस्त वाहनातून 30 जणं प्रवास करत असल्याची माहिती आहे. जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले असून त्यापेकी 4 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. अपघात ग्रस्त लोक हे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील मुंडखेडा या गावचे असल्याची माहिती मिळाली आहे.

पोलिसांची घटनास्थळी धाव

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी यानंतर वाहतूक सुरळीत केली आहे. तर,अपघातग्रस्त वाहन रस्त्यातून बाजूला करण्यात आलं आहे.

जखमी खासगी रुग्णालयात दाखल

अपघातग्रस्त वाहनातून 30 लोक प्रवास करत असल्याची माहिती मिळतेय. यापैकी 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 15  जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

इतर बातम्या: 

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चप्पल फेकल्याची घटना, पिंपरीत भाजप राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने

Video : असे फालतू चिल्लर लोक असतातच, चप्पल फेकीवरुन देवेंद्र फडणवीसांनी सुनावलं