नाशिकमध्ये पुन्हा 29 उंट ताब्यात, पांजरपोळच्या जंगलात उंटांची संख्या 111 वर; मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता

नाशिकच्या पांजरपोळ येथील जंगलात जवळपास 111 उंट झाले आहेत. तीन टप्पात आत्तापर्यन्त ही उंट ताब्यात घेण्यात आली आहे. कत्तलचा संशय असल्याने जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने यामध्ये दखल घेतली आहे.

नाशिकमध्ये पुन्हा 29 उंट ताब्यात, पांजरपोळच्या जंगलात उंटांची संख्या 111 वर; मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता
Image Credit source: TV9 Network
| Updated on: May 06, 2023 | 6:51 PM

नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून नाशिकच्या दिशेने उंट जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. पुन्हा दिंडोरी – म्हसरूळ परिसरात 29 उंट जातांना प्राणी मित्र आणि पोलिसांनी ताब्यात घेतले असून उंट पांजरपोळच्या जंगलात सोडण्यात आले आहे. तिथं गो संस्थेच्या माध्यमातून देखभाल केली जात आहे. त्यामध्ये पुरुषोत्तम आव्हाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राजस्थान येथून हैदराबादच्या दिशेने जात असतांना ताब्यात घेतले आहे. खरंतर उंटांचा हा ताफा पाहून नाशिककरांनी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. जवळपास 111 उंट नाशिकमध्ये तीन टप्प्यात दाखल झाले आहे. ही उंट कुणाची आहे याबाबत कुठलीही माहिती समोर न आल्याने मोठा कट असल्याचं बोललं जात आहे.

यातील दोन उंटांचा यापूर्वी मृत्यू झाला आहे. तर दहा ते बारा उंट अस्वस्थ आहे. त्यांच्यावर उपचार केले जात आहे. गोशाळा चालवणाऱ्यांनी पांजरपोळ येथे मोठ्या प्रमाणात ऊस पोहचवला आहे. तर प्राणी प्रेमींनी मोठ्या प्रमाणात गुळ आणि शेंगदाणे उंटांसाठी दिले आहे.

सुरुवातीला 60 च्या जवळपास उंटांचा ताफा आला होता. त्यानंतर 24 उंटांचा ताफा आला होता. त्यानंतर आता पुन्हा 29 उंटांचा ताफा आला आहे. यामध्ये दोन उंटांचा मृत्यू झाला असून आता 111 उंट पांजरपोळ येथे दाखल असून त्यांची देखभाल केली जात आहे.

धुळे – नंदुरबार मार्गे राजस्थानवरून हैदराबादच्या दिशेने हे उंट जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामध्ये ही उंट कत्तलीसाठी जात असल्याचे समोर आल्यानंतर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी चौकशी करत चौकशीची मागणी केली आहे. त्यामध्ये पोलिसांनीही याची दखल घेतली आहे.

यामध्ये जवळपास 40 लोकं या उंटासोबत होते. मात्र, ज्यांना संशय आल्याने टयांच्याकडे चौकशी केली असतांना प्राणी मित्रांना वेगवेगळी उत्तरे मिळाली होती. त्यावरून संशय वाढल्याने ही उंट ताब्यात घेण्यात आली आहे. यामध्ये जिल्हाधिकारी यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले आहे.