सौभाग्याचं लेणं असुरक्षित, पोलिसांचं टेंशन पुन्हा वाढलं, तीन घटनांनी शहरात महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर?

नाशिक शहरातील वेगवेगळ्या भागात महिलांच्या अंगावर सोने चोरट्यांनी ओरबाडून नेले आहे. लाखो रुपयांचे सोनं गेल्यानं महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सौभाग्याचं लेणं असुरक्षित, पोलिसांचं टेंशन पुन्हा वाढलं, तीन घटनांनी शहरात महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर?
डोंबिवलीत 24 गुन्हेगारांवर मोक्का कारवाईImage Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Apr 17, 2023 | 1:43 PM

नाशिक : गेल्या काही महिन्यांपासून नाशिक शहरांमध्ये सोनसाखळी चोरीच्या घटनांना ब्रेक लागला होता. त्यामुळे काहीसा महिला वर्गांमध्ये दिलासा मिळाला होता. नाशिक शहर पोलिसांना सोनसाखळी चोरीच्या घटनांवर आळा बसविण्यात यश मिळवलं होतं. मात्र, आता पुन्हा नाशिक शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी तीन चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा नाशिक शहर पोलिसांचं चोरांनी टेन्शन वाढवलं आहे. कुणाच्या गळ्यातील मंगळसूत्र तर कुणाच्या हातातील सोन्याच्या बांगड्या चोऱ्यांनी ओरबाडून नेल्याची घटना समोर आली आहे. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला असला तरी अद्यापही चोरटे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यामुळे शहरात उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे.

पहिली घटना ही म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत वैदूवाडी येथे ममता प्रकाश काले या पायी जात असतांना दुचाकीवर आलेल्या एका भामट्याने 30 हजार रुपयांच्या किंमतीची सोन्याची चैन ओरबाडून नेली आहे. म्हसरूळ पोलिस ठाण्यात यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिकचा तपास केला जात आहे.

तर दुसऱ्या दोन्ही घटना या सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्या असून यामध्ये शीतल सुरेश बच्छाव या मेनरोड परिसरात खरेदीसाठी आल्या असतांना पर्स मध्ये ठेवलेली 1 लाख साठ हजार रुपयांची सोन्याची चैन लंपास केली आहे. खरेदी करत असतांना गर्दीचा फायदा घेत ही चोरी झाली आहे.

हे सुद्धा वाचा

तर तिसऱ्या घटनेत एका वृद्ध महिलेलेच्या हातातील सोन्याच्या बांगडया चोरट्यांनी ओरबडल्या आहेत. जवळपास साठ हजार रुपये किमितीच्या त्या सोन्याच्या बांगड्या होत्या. त्यात आज्जीचा नातू साहिल देवरे याने दिलेल्या तक्रारीवरुण सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकूणच पायी चालणे देखील महिलांच्या दृष्टीने सुरक्षित राहिलेले नाही. चोरटे अंगावरून सोन्याचे दागिने ओरबडत आहे. त्यामुळे महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांचे या घटनेवरुन टेंशन वाढलं असून चोरांच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरू आहे.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.