गाडीला धडक देत तरुणावर हल्ला, गोळीबार आणि कोयत्याचे वार, चित्रपटाला शोभेल असा सीन पाहून तुम्हालाही धडकी भरेल, VIDEO

चित्रपटाला लाजवेल अशी घटना नाशिकच्या कार्बन नाका परिसरात घडली आहे. विशेष बाब म्हणजे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून संपूर्ण शहर हादरलं आहे.

गाडीला धडक देत तरुणावर हल्ला, गोळीबार आणि कोयत्याचे वार, चित्रपटाला शोभेल असा सीन पाहून तुम्हालाही धडकी भरेल, VIDEO
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Mar 20, 2023 | 1:08 PM

नाशिक : काही गुन्हे हे असे असतात की त्याची कल्पना सुद्धा कुणी केलेली नसते. याशिवाय काही गुन्हे असे असतात की चित्रपटाच्या निर्मात्याच्या कल्पनेच्या पलीकडील असतात. तर काही गुन्हे हे चित्रपटातील दृश्य पाहून केलेले असतात. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर खरंतर या बाबी उघडकीस येतात. पण नाशिकच्या कार्बन नाका परिसरातील अशाच एका घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यातील संपूर्ण प्रसंग पाहून तुमच्या अंगावर काटा येऊ शकतो, तुम्हाला धडकी भरू शकते असे हे दृश्य आहे. गोळीबार आणि कोयत्याचा वापर हल्ल्यात करण्यात आल्याचा थराराचे सीसीटीव्ही समोर आल्यानं शहरात खळबळ उडाली आहे.

नाशिकच्या कार्बन नाका परिसरात सिनेस्टाईल घटना घडली असून त्या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही समोर आहे. तीन तरुणांनी एकावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असून अधिकचा तपास केला जात आहे.

यामध्ये रविवारी दुपारी तपन जाधव आपल्या कारमधू प्रवास करीत होता. त्याच वेळेला कार्बन नाका परिसरात संशयित आरोपींनी स्वतः बसलेल्या कारने मागील बाजूला धडक दिली. यामध्ये धडक देताच गाडीने ज्या दिशेने येत होती त्या दिशेने दिशा बदलली.

गाडीला धडक बसतात संशयित आरोपी आशिष जाधव यांनी आपल्या दोन साथीदारांसह तपन कडे धाव घेतली. त्यात तपनच्या लक्षात आले आपल्यावर हल्ला होत आहे. त्याने लागलीच गाडीतून उतरून पळण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळेला गाडीतून उतरलेल्या संशयितांनी पाठलाग सुरू केला.

तिन्ही संशयितांनी तपन याच्यावर गोळीबार केला आणि कोयत्याने वार केले. यामध्ये तपन जाधव हा गंभीर जखमी असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून आरोपींचा शोध पोलिस घेत आहे. जुन्या वादातून ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.

तर दुसरीकडे याच दरम्यान संशयित आरोपींची गाडी बंद पडल्याने त्यांनी एका कामगाराला धाक दाखवत त्याची दुचाकी हिसकावून घेत पोबारा केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून व्हिडिओ बघून नाशिककरांमध्ये खळबळ उडाली आहे.