AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मित्राचा वाद तरुणाच्या जीवावर बेतला, दोघांच्या वादात भररस्त्यात निष्पाप तरुणासोबत अनर्थ घडला !

मित्रांसोबत तरुण हॉटेलमध्ये जेवायला आला होता. मात्र त्याच्या मित्रासोबत काही तरुणांचा जुना वाद होता. हा वाद उफाळून आला आणि तरुणाचा यात नाहक बळी गेला.

मित्राचा वाद तरुणाच्या जीवावर बेतला, दोघांच्या वादात भररस्त्यात निष्पाप तरुणासोबत अनर्थ घडला !
पूर्ववैमनस्यातून तरुणाला संपवलेImage Credit source: TV9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Apr 26, 2023 | 2:59 PM
Share

चंदन पुजाधिकारी, नाशिक : नाशिक शहरात गुन्हेगारी घटनांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. पुन्हा एकदा सिडको परिसरात एका युवकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली जुन्या वादातून चार ते पाच संशयितांनी तरुणावर जीवघेणा हल्ला करत त्याची हत्या केल्याची घटना नाशिमधील सिडको परिसरात घडली आहे. सिडकोच्या सावतानगर येथे पुर्ववैमनस्यातून 24 वर्षीय तरुणाची हत्या झाली. ही थरारक घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. परशुराम बाळासाहेब नजान असे मयत तरुणाचे नाव आहे. विशेष म्हणजे परशुरामच्या मित्राचा आरोपींसोबत जुना वाद होता. यातून हा हल्ला झाला आणि परशुरामचा नाहक बळी गेला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

मित्रांसोबत जेवण करण्यासाठी हॉटेलमध्ये आला होता

परशुराम बाळासाहेब नजान हा तरुण सावतानगर येथील एका हॉटेलमध्ये मित्रांसोबत जेवण करण्यासाठी आला होता. त्याच्यासोबत असलेल्या मित्राचे आणि संशयित आरोपींचे जुने भांडण होते. याच भांडणातून त्याची कुरापत काढून तीन ते चार संशयितांनी हॉटेलच्या बाहेर पडलेला पेव्हर ब्लॉक परशुरामच्या डोक्यात टाकला. यात तो गंभीर जखमी झाला.

उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

परशुरामच्या मित्रांनी त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. मात्र अतिरक्तस्रावामुळे परशुरामला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना परशुरामचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ही सर्व धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान