Nashik Crime : पहाटे सगळे गाढ झोपेत.. दबक्या पावलांनी ‘ते’ आले अन् घर साफ करून फरार

पहाटेच्या सुमारास सर्वजण साखर झोपेत असताना असं काही घडलं की संपूर्ण घर गोंधळात बुडालं. चोरट्यांनी त्यांचा प्रताप दाखवत मौल्यवान ऐवज लुटून नेला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Nashik Crime : पहाटे सगळे गाढ झोपेत.. दबक्या पावलांनी 'ते'  आले अन् घर साफ करून फरार
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Oct 16, 2023 | 3:05 PM

नाशिक | 16 ऑक्टोबर 2023 : नाशिकमध्ये (nashik city) सध्या गुन्ह्यांचे सत्र वाढताना दिसत आहे. कधी चोरी, तर कधी लूटमार, दुकान लुटलं अशा वेगवेगळ्या घटना सतत कानावर येत असतात. त्यामुळे नागरिक (nashik crime) धास्तावले आहेत. गुन्हे रोखण्यासाठी आणि गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिस शर्थीचे प्रयत्न करत असतात. पण त्यानंतरही बऱ्याच प्रमाणात गुन्हे घडत आहेत.

अशीच एक घरफोडीची घटना (robbery case) चेहडी परिसरातील म्हस्के मळ्यात घडली आहे. पहाटेच्या सुमारास सर्वजण साखर झोपेत असताना असं काही घडलं की संपूर्ण घर गोंधळात बुडालं. चोरट्यांनी त्यांचा प्रताप दाखवत मौल्यवान ऐवज लुटून नेला आणि घरच्या लोकांवर डोक्याला हात मारण्याची वेळ आली.

लुटला लाखो रुपयांचा माल

नाशिकच्या चेहडी परिसरातील म्हस्के मळ्यात म्हस्के यांच्या घरात घडलेल्या घटनेने सगळं शहरच हादरून गेलं. पहाटेच्या वेळी संपूर्ण म्हस्के परिवार गाढ झोपेत असतानाच चोरट्यांनी त्यांचा प्रताप दाखवला. स्वयंपाक घरातील आतली कडी तोडून ते आत घुसले आणि तीन लाखांची चोरी केली. दाराची कडी तोडून चोरटे आत घुसल्यावर त्यांनी तेथे झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील सहा तोळे वजनाची दोन मंगळसूत्रे बळजबरीने चोरली.

मागल्या दरवाजाने घुसले आत

पहाटेच्या सुमारास म्हस्के यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या मागील बाजूस असलेला दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. घरात आल्यानंतर ते स्वयंपाक घरात शिरले आणि तेथील भांड्यांची उचकापाचक करून ती घराबाहेर आणून ठेवली. त्याचवेळी एका डब्यात ठेवलेले ४० हजार रुपये त्यांना मिळाले. चोरट्यांनी ते लंपास केले. त्यानंतर बेडरूमची कडी तोडून आतमध्ये गाढ झोपेत असलेल्या महिलेच्या गळ्यातील पोत तोडली, मंगळसूत्रही पळवले.

एकूण मिळून तीन लाख रुपयांचा माल आणि रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. सकाळी उठल्यावर सर्व प्रकार लक्षात आला आणि घरात एकच गदारोळ माजला. चोरीच्या घटनेची तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर नाशिक रोड पोलिस स्टेशनमधील अधिकारी आणि श्वान पथक घटनास्थळी दाखले झाले व त्यांनी तपास सुरू केला. नाशिकरोड पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.