ओळखू येऊ नये यासाठी दाढी केस कापले, तरीही पोलिसांच्या जाळ्यात अडकलाच, नाशिक पोलिसांची दबंग कामगिरी…

मुंबईत फिरण्यासाठी पैशांची गरज होती, मात्र स्वीकारलेला मार्ग चुकीचा होता. नाशिकमध्ये येऊन त्याने जे गंभीर कृत्या केलं ते धक्कादायक होतं, पोलिसांनी हरियाणा येथे जाऊन केली मोठी कारवाई.

ओळखू येऊ नये यासाठी दाढी केस कापले, तरीही पोलिसांच्या जाळ्यात अडकलाच, नाशिक पोलिसांची दबंग कामगिरी...
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Apr 04, 2023 | 2:02 PM

नाशिक : गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात रोहिणी इंडस्ट्रीज कंपनीचे मालक योगेश मोगरे यांची हत्या झाली होती. ही हत्या का झाली अशी चर्चा सुरू असतांनाच हत्येमागील कारण नाशिक पोलिसांनी शोधून काढले होते. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे नाशिक पोलिसांनी केलेल्या कारवाईत हरियाणा येथील दोघांनी खून केल्याचे निष्पन्न झाले होते. नाशिकच्या गुन्हे शाखेकडून तपास केला जात असतांना कपडे खरेदी केल्याच्या पावतीवरुन या गुन्ह्याची उकल झाली आहे. खरंतर मुंबई येऊन पैसे कमविण्यासाठी त्यांनी चोरी करण्याचे ठरविले होते. मात्र, तिथे राहण्यासाठी जास्त पैशांची आवश्यकता असल्याने त्यांनी आपला मोर्चा नाशिककडे वळविला होता.

त्यानंतर त्यांना योगेश मोगरे यांची कार नजरेस पडली होती. त्यामध्ये हरियाणा येथील दोघांनी सिगारेट घेण्यासाठी थांबलेल्या योगेश मोगरे यांच्याकडून चावी खेचण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांनी चावी नदिल्याने त्यांच्यावर हल्ला झाला होता.

योगेश मोगरे यांच्या दंडावर चाकूने हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने मोगरे जमिनीवर कोसळले होते. त्यानंतर हरियाणा येथील दोघा संशयित आरोपींनी पळ काढला होता.

हे सुद्धा वाचा

मुंबईत फिरण्यासाठी पैसे लागणार म्हणून ग्रामीण भागात त्यांनी चोरीच्या उद्देशाने थेट हत्या केल्याची बाब समोर आली आहे. यामध्ये कपडे खरेदीचे बील मिळून आल्याने ही हत्येची घटना उघडकीस आली आहे.

त्यामध्ये काही दिवसांपूर्वी यातील मुख्य संशयित आरोपी आणि त्याचा साथीदार हा अल्पवयीन फरार होता. त्यातील अल्पवयीन आरोपी पकडला जात असतांना मुख्य संशयित हा फरार झाला होता.

त्यामध्ये अजितसिंग सत्यवान लठवाल ह्या मुख्य संशयिताने दाढी आणि डोक्याचे केस कापून थेट जंगलात धाव घेतली होती. तिथे लपून बसला होता. मात्र त्यानंतरही नाशिक पोलिसांनी त्याचा तपास घेत त्याला जंगलात सापळा रचून ताब्यात घेतले आहे.

खरंतर चोरांनी हल्ला केल्यानंतर एक पिशवी तिथेच टाकून दिली होती. त्यानंतर पोलिसांना त्याच्यामध्ये एक कपड्याची पिशवी सापडली त्यात बिलं असल्याने त्याच्या आधारावर ह्या गुन्ह्याची उकल करण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.