
नालासोपाऱ्यात एका विवाहीत महिलेने शेजारीच राहणाऱ्या बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा खून करून घरातच त्याचा मृतदेह पुरला. आणि कहर म्हणजे त्याच नवऱ्याच्या भावाकडून, म्हणजचे तिच्या दीराकडून तो मृतदेह पुरला तिथेच वर टाईल्सही बसवून घेतल्या. अत्यंत थंडपणे केलेल्या या गुन्ह्यामुळे मुंबई हादरलेली असतानाच आता नवी मुंबईतही खुनाची अशीच एक भयानक घटना उघडकीस आली आहे. नवी मुंबईतील वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. तेथे पदवीच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या 22 वर्षीय एका मुलाने प्रेम प्रकरणातून त्याच्या प्रेयसीच्या नवऱ्याचा डोक्यात फावडा घालून निर्घृण खून केला. यामुळे नवी मुंबईतील रहिवासी प्रचंड हादरले आहेत.
नक्की काय घडलं ?
2 मुले असलेल्या एका विवाहित महिलेचे मागील अडीच वर्षापासून एका पदवीच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या मुलासोबत प्रेम संबंध होते. याबाबतची माहीत तिच्या पतीला समजताच त्याने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. याच मुद्यावरून त्यांच्यात अनेकवेळा भांडणही झाले. मात्र तरीही पत्नीचे अनैतिक संबंध सुरूच राहिल्याने अखेर काल रात्री तिचा पती थेट तिच्या प्रियकराच्या घरी गेला. आणि तिथे गेल्यावर तुझे माझ्या पत्नीसोबत काय संबंध आहेत सांग, अनेकांनी तुमच्याबद्दल आम्हाला सांगितले आहे सं त्याला विचारून भांडू लागला. दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला.
पाहता पाहता त्यांचा वाद इतका टोकाला गेला की,आरोपी तरूणाने घरातील फावडा घेतला आणि तो त्याच्या प्रेयसीच्या नवऱ्याच्या डोक्यात घातला. एवढंच नव्हे तर तो मेल्याची खातरजमा करण्यासाठी त्याने त्या इसमाचा गळा आवळून खूनही केला. त्यानंतर आरोपीने मयत व्यक्तीला नवी मुंबईतील वाशी खाडी किनारी नेऊन फेकले. मृतदेह पोलिसांना मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आणि विचित्र प्रेम प्रकरणाचा खुलासा झाला आणि ही भयानक माहिती समोर आल्यावर पोलिसही अचंबित झाले.
लग्नाची मागणी घातली मात्र दिला नकार
मिळालेल्या माहिती नुसार,कॉलेजमध्ये शिकणाऱ्या त्या मुलाने महिलेला लग्नाचीही मागणी घातली होती, पण त्या महिलेने त्याला लग्नास नकार दिला. त्याचा रागही आरोपी तरूणाच्या मनात होता. आणि तोच राग मनात वूनही त्याने त्या महिलेच्या पतीची हत्या केली. एवढंच नव्हे तर कोणालाही संशय येऊ नये म्हणून त्याने त्या इसमाचा मृतदेह चिखलात गाडून ठेवाल, आणि प्रेयसीला फोन करून तुझा नवरा घरी येणार नसल्याचेही सांगितले. आरोपी अमीनुर आली मौला हा 22 वर्षांचा असून तो मूळ कोलकाताचा रहिवासी आहे. पोलिसांनी त्याला याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता, त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी वाशी पोलीस अधिक तपास करत आहेत.